Firing in BSF Headquarter Dainik Gomantak
देश

बीएसएफच्या मुख्यालयावर जवानाने केला गोळीबार, 5 ठार

बीएसएफने या घटनेबाबत एक निवेदन जारी केलय

दैनिक गोमन्तक

पंजाबमधील अमृतसर येथे असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) मुख्यालयात एका जवानाने रागाच्या भरात येऊन बीएसएफ मुख्यालयात गोळीबार केला आहे. या घटनेत गोळी झाडणाऱ्या जवानासह 5 जवानांचा मृत्यू झाला आहे. जखमी जवान उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर गोळी झाडणाऱ्या जवानाने स्वत:वर गोळी झाडली. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तेथे त्यांचाही मृत्यू झाला. गोळीबार करणारा आरोपी (Accused) जवान महाराष्ट्रातील आहे.

बीएसएफने (BSF) या घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. ही घटना अमृतसरच्या 144 बटालियन खासामध्ये घडल्याचे बीएसएफने म्हटले आहे. या घटनेत गोळीबार करणाऱ्या साताप्पासह 6 जवान जखमी झाले. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. यासोबतच या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हरटाइम ड्युटीमुळे हा जवान मानसिक तणावातून जात होता. एका वृत्तानुसार, ड्युटीच्या वेळेवरून जवानाचा आपल्या अधिकाऱ्यांशी वाद झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या जवानाने रविवारी आवारात गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि इतर सैनिक (Soldier) जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले.

वृत्तानुसार सुमारे 12 सैनिक जखमी झाले आहेत. दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. अधिकारीही याबाबत अद्याप काहीही बोलण्यास तयार नाहीत. मृतदेह रुग्णालयाच्या (Hospital) शवागारात ठेवण्यात आले असून जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मृतांच्या कुटुंबियांना देण्यात येत आहे. बीएसएफचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

SCROLL FOR NEXT