Amarinder Singh

 

Dainik Gomantak 

देश

Punjab Assembly Election: अमरिंदर सिंग यांनी भाजपसोबत युतीची केली घोषणा

देशात आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका होत आहेत. यातच पंजाब राज्याचाही समावेश आहे.

Manish Jadhav

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंजाब निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याची घोषणा केली आहे. अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली. अमरिंदर सिंग यांना जागांच्या वाटपाबाबत विचारले असता ते म्हणाले, विजयाच्या शक्यतेच्या आधारे हे केले जाईल. पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly Election) भाजप, अमरिंदर यांचा पक्ष आणि अन्य पक्षांची युती होणार आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत यंदाची लढत रंजक असणार आहे. या आघाडीशिवाय काँग्रेस (Congress), आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) आणि अकाली टेन-बसप यांची आघाडीही रिंगणात आहे. माजी मुख्यमंत्री सिंग पुढे म्हणाले, आमच्या दोन्ही पक्षांमध्ये बराच काळ चर्चा सुरु होती. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजप (Bjp) उमेदवारांना पाठिंबा देऊ. तसेच ते ही आमच्या उमेदवारांना पाठिंबा देतील. मात्र, कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

विशेष म्हणजे, कृषीविषयक कायदे परत आल्यानंतर अमरिंदर सिंग आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढली होती. अमरिंदर सिंग यांनी यापूर्वी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचीही भेट घेतली होती. यूपी, उत्तराखंड (Uttarakhand) या राज्यांसह पंजाबमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान निवडणुका होणार आहेत. मात्र, आतापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना आपल्या पक्षाला पंजाबमध्ये मजबूत करायचे आहे. आगामी काळात काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यास काही उमेदवार त्यांच्या बाजूने कोण येऊ शकतात, याकडे त्यांची नजर असणार आहे. युतीतील तिसरा पक्ष सुखदेवसिंग धिंडसा यांचा पक्ष आहे. भाजप किमान 70 जागांवर निवडणूक लढवू शकते, असे मानले जात आहे की, ते आघाडीतील वरिष्ठ भागीदाराच्या भूमिकेत असतील. तर अमरिंदर यांचा पंजाब लोक काँग्रेस 35 ते 40 जागांवर उमेदवार उभे करु शकतो. उर्वरित जागा धिंडसांच्या पक्षाला मिळू शकतात.

शिवाय, पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन हटल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी काँग्रेससोबतचे 40 वर्षे जुने संबंध तोडले होते, हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे. आपला अपमान करुन मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आल्याचे अमरिंदर सिंग यांनी त्यावेळी म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT