Jama Masjid Dainik Gomantak
देश

पैगंबर विवाद: जामा मशिदीत नुपूर शर्मांचा निषेध, नमाजानंतर जोरदार घोषणाबाजी

नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात दिल्लीतील जामा मशिदीत निदर्शने करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात दिल्लीतील जामा मशिदीत निदर्शने करण्यात आली. मुस्लमी बांधवांनी शुक्रवारच्या नमाजनंतर हा निषेध नोंदवला. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची छायाचित्रे असलेले बॅनर आणि पोस्टर्स घेऊन मोठ्या संख्येने लोक जामा मशिदीत आले होते. या निदर्शनानंतर दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. आंदोलकांची समजूत घालून त्यांना घरी पाठवण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांकडून करण्यात येत आहेत. (Protest Against Nupur Sharma In Jama Masjid Against Her Statement Over Prophet Muhammad)

दरम्यान, नुपूर शर्मांनी एका टीव्ही डिबेट दरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्यावर कमेंट केली होती, त्यानंतर गदारोळ निर्माण झाला होता. गेल्या आठवड्यात शुक्रवारी कानपूरमध्ये हिंसाचार उसळला, त्यानंतर संपूर्ण यूपीमध्ये मुझफ्फरनगरपासून काशीपर्यंत कारवाई करण्यात आली. परंतु आज जामा मशिदीमध्ये झालेल्या निदर्षानंतर दिल्ली (Delhi) पोलिसांच्या तयारीवर आणि त्यांच्या इनपुटवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तसेच, जामा मशिदीत जमलेल्या आंदोलकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर पोलिस कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यांना निलंबित करणे किंवा भाजपमधून बडतर्फ करणे पुरेसे नाही. प्रार्थनेनंतर शेकडो लोक बाहेर आले आणि घोषणाबाजी करु लागले. ज्या प्रकारे लोक बॅनर्स आणि पोस्टर्स घेऊन आले होते, त्यावरुन या निदर्शनाची तयारी आधीच झाल्याचे स्पष्ट होते. त्याचवेळी या निदर्शनाबाबत जामा मशिदीच्या शाही इमामांना विचारले असता, मला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

लखनऊच्या माउंड वाली मशिदीतही निदर्शने झाली

लखनऊच्या (Lucknow) माउंड वाली मशिदीतही निदर्शनं झाल्याचं वृत्त आहे. याशिवाय कोलकात्यात काही मशिदींजवळ निदर्शनेही झाली आहेत. या प्रकरणाने आंतरराष्ट्रीय स्वरुप धारण केले आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. इराण, सौदी अरेबिया (Saudi Arabia), बहरीन, यूएई, कतारसह अनेक इस्लामिक देशांनी या मुद्द्यावर भारतावर (India) आक्षेप घेतला होता. आता जामा मशिदीतील अशा प्रकारचा निषेध महत्त्वाचा आहे, कारण त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे. इथे आंदोलन करणे हा मोठा संदेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT