Priyanka Gandhi Dainik Gomantak
देश

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची कमान प्रियंका गांधींवर

राष्ट्रीय काँग्रेसने आखली नवी रणनिती

दैनिक गोमन्तक

यंदा हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने नव्या आखणी करत आहे. यात राष्ट्रीय काँग्रेसने ही तयारीला सुरुवात केली आहे. यामध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या महत्वाची भूमिका बजावणार आहेत. (Priyanka Gandhi in charge of Himachal Pradesh Assembly elections)

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी काँग्रेसने विशेष रणनिती आखली आहे. ही निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने प्रियांका गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घेतल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर आली आहे. घेतलेल्या निर्णयानुसार काँग्रेस पक्षाने प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय सचिव देण्याचा निर्णय घेतला आहे. या सचिवांपैकी एक तृतीयांश सचिव हे प्रियांका गांधी यांच्या टीमचे असणार आहेत.

या बैठकीत राष्ट्रीय सचिव ही होते उपस्थित

बैठकीत उपस्थित असलेल्या सचिवांमध्ये दीपिका पांडे, चंदन यादव, राजेश तिवारी, रोहित चौधरी, धीरज गुर्जर, प्रदीप नरवाल, विकास उपाध्याय, विजय सिंगला आणि चेतन चौहान यांचा समावेश होता. या सर्व राष्ट्रीय सचिवांना आठवडाभरात कामाला सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरानंतर या सचिवांना पक्षाच्या वतीने हे काम देण्यात आले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि प्रभारी राजीव शुक्ला यांनी काँग्रेस मुख्यालयातील बैठकीला हजेरी लावली, त्यांनी देखील आवश्यक त्या सूचना या बैठकीत दिल्या आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये ही प्रियंका गांधींवर महत्त्वाची जबाबदारी

गेल्या काही महिन्यांपूर्वी उत्तरप्रदेश विधान सभेचा निकाल हाती आला होता. राष्ट्रीय काँग्रेस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली निंवडणूक लढवत होते. मात्र निकाल पाहता राष्ट्रीय काँग्रेसची कामगिरी ही अत्यंत खराब होती. असे असले तरी मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय काँग्रेसने नवी आखणी केली आहे. त्यामूळे हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल काय असणार आहेत. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT