Fumio Kishida India Visit Dainik Gomantak
देश

Viral Video: जपानच्या पंतप्रधानांनी चाखली लस्सी आणि पाणीपुरी; दिल्लीतील बागेत फेरफटका

दोन्ही देशांमध्ये दोन करार

Akshay Nirmale

Fumio Kishida India Visit: जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी किशिदा यांनी दिल्लीच्या बुद्ध पार्कमध्ये पंतप्रधान मोदींसोबत फेरफटका मारला. यावेळी किशिदा यांनी मोदींसोबत भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतला.

दोन्ही नेत्यांचा या बागेतील फेरफटका मारतानाचा तसेच पाणीपुरी खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन्ही नेत्यांनी उद्यानातील बाल बोधी वृक्षाला भेट दिली. या वृक्षाला फुलांच्या पाकळ्या अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि पंतप्रधान मोदी यांनी येथे पाणीपुरी, लस्सी आणि आंब्याचे पन्हे या पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी मोदींसह किशिदा यांनी रवीच्या सहाय्याने डेऱ्यातील लस्सी घुसळताना या व्हिडिओमध्ये दिसतात. दिसतात.

तत्पुर्वी या दोन्ही नेत्यांच्या भेटीत दोन करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. द्विपक्षीय संबंधांतील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञान सहकार्य, व्यापार, आरोग्य आणि डिजिटल भागीदारी यावर उभय नेत्यांत चर्चा झाली.

परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले की, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान दोन करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यात आधी जपानी भाषेत MOC (सहकाराचे ज्ञापन) नूतनीकरण करणे आणि मूलत: उच्च स्तरीय भाषा शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा समावेश आहे.

दुसरा करार मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर JICA च्या 300 अब्ज रुपयांच्या कर्जाबाबत होता.

पीएम मोदींनी 'कदमवुड जाली बॉक्स' (कदंब लाकडापासून बनवलेला बॉक्स) फुमियो किशिदा यांना दिला. शिवाय चंदनाची बुद्ध मूर्तीही भेट दिली. हे वर्ष भारत आणि जपान या दोघांसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे कारण G-20 चे अध्यक्षपद भारताकडे आहे आणि G-7 चे अध्यक्षपद जपानकडे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Goa News Live: जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Weather: राज्यात असंतुलित हवामान, आजारात वाढ शक्य; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन

Vasco Fish Market: प्रतीक्षा संपली! वास्कोतील मासळी मार्केट 29 पासून खुले, सध्याची जागा 28 पर्यंत खाली करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT