PM Narendra Modi
PM Narendra Modi  Dainik Gomantak
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 20 जून रोजी कर्नाटकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत आणि बंगळुरूमध्ये एका सार्वजनिक मेळाव्याला संबोधित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Prime Minister Narendra Modi to visit Karnataka today)

पंतप्रधान मोदी 20 जून रोजी सकाळी 11:55 वाजता बेंगळुरू येथील येलाहंका हवाई तळावर पोहोचतील. तसेच पंतप्रधान युक्रेनमध्ये ठार झालेल्या वैद्यकीय विद्यार्थी नवीनच्या कुटुंबाला भेटतील.

पंतप्रधान मोदी 27,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी करण्यासाठी सोमवारी कर्नाटकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) बेंगळुरूला भेट देतील, जिथे ते मेंदू संशोधन केंद्र (CBR) चे उद्घाटन करतील आणि पायाभरणी देखील करतील.

हे केंद्र एक प्रकारची संशोधन सुविधा म्हणून विकसित केले आहे आणि मेंदूच्या विकारांचे व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन आयोजित करण्यावर लक्ष केंद्रित करत असते. 'एक सूर्य, एक पृथ्वी' ही संकल्पना. हा अभिनव कार्यक्रम डीडी इंडियावर 21 जून रोजी पहाटे 3 वाजता (फिजी येथून प्रसारित) IST पासून रात्री 10 वाजेपर्यंत (सॅन फ्रान्सिस्को यूएसए येथून प्रसारित)

थेट प्रसारित केला जाणार आहे. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, म्हैसूरमधील पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. IST सकाळी 06:30 पासून DD India वर दिसणार आहे. 2015 पासून, आंतरराष्ट्रीय योग दिवस (IDY) दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा करण्यात येतो.

या वर्षीच्या योग दिनाची थीम "मानवतेसाठी योग" अशी असणार आहे. कोविड महामारीच्या काळात योगाने मानवतेची कशी सेवा केली याचे चित्रण अशी ही थीम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

Vasco News : चिखलीत बिल्डरने अवैधपणे बनवली पार्किंगसाठी जागा

Pernem Rain : वादळी वाऱ्यामुळे पेडणे तालुक्यात पडझड सुरूच

Tihar Jail: तिहार जेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु

SCROLL FOR NEXT