Cyclone Biparjoy| PM Modi Dainik Gomantak
देश

Cyclone Biparjoy Alert: बिपरजॉय बनले धोकादायक; पंतप्रधान मोदींनी बोलावली बैठक, मुंबईपासून केरळपर्यंत अलर्ट...

बिपरजॉयचे तीव्र चक्री वादळात रुपांतर झाले असून हवामान खात्याने यासंदर्भात गुजरातमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

Puja Bonkile

Cyclone Biparjoy Alert: बिपरजॉय चक्रीवादळाने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपले तीव्र रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई ते केरळ किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. 

समुद्राच्या मध्यातून उंच लाटा उसळत आहेत आणि किनाऱ्यावर आदळत आहेत. वादळाची परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोमवारी (12 जून) दुपारी एक वाजता बैठक बोलावली असून, त्यात ते तयारीचा आढावा घेणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

बिपरजॉयचे रविवारी तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले होते. ते भारताच्या किनारपट्टीकडे वेगाने पुढे जात आहे. 15 जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी त्याचा परिणाम आतापासूनच दिसायला लागला आहे. मुंबईत वादळी वाऱ्यांमुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे.

गुजरातमध्ये ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र प्रदेशात इशाऱ्याची स्थिती बदलली आहे. यापूर्वी येथे यलो अलर्ट जाहीर करण्यात आला होता. बिपरजॉय 15 जूनच्या दुपारपर्यंत मांडवी आणि कराची दरम्यान जाण्याची शक्यता आहे. 

चक्रीवादळाच्या इशाऱ्यांदरम्यान, गुजरातच्या कच्छमधील सखल किनारपट्टीच्या भागातून लोकांना तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये हलवण्यात येत आहे. वृत्तसंस्था एएनआयने दीनदयाल बंदर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, रविवारी (11 जून) सहा जहाजांनी बंदर सोडले आणि आणखी 11 जहाजे सोमवारी निघतील. बंदर अधिकारी आणि जहाज मालकांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, जोरदार वारे वाहत असल्याने त्याचा कोकण तसेच मुंबईच्या किनारी भागांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने कर्नाटक, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

तसेच, गणपतीपुळे येथील किनाऱ्यावर वादळ धडकल्याने बीचवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकल्याने व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर आता नुकसानग्रस्त भागांत शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

Viral Video: नवी कोरी थार काही दिवसांत बंद पडली; मालकाने गाढवं बांधून, ताशा वाजवत कार शोरुमला ओढत नेली, व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

SCROLL FOR NEXT