पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रगती मैदानावर दोन दिवसीय 'इंडिया ड्रोन फेस्टिव्हल 2022' चे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी लोकांना संबोधित करताना सांगितले की, ड्रोन तंत्रज्ञानाबाबत भारतात जो उत्साह दिसत आहे, तो आश्चर्यकारक आहे. भारतातील ड्रोन सेवा आणि ड्रोन आधारित उद्योगातील क्वांटम जंपचे प्रतिबिंब आहे. हे भारतातील रोजगाराच्या उदयोन्मुख मोठ्या क्षेत्राची क्षमता दर्शवते.
पीएम मोदी पुढे म्हणाले, ड्रोन (Drones) तंत्रज्ञान मोठ्या क्रांतीचा आधार कसा बनत आहे, याचे उदाहरण म्हणजे पीएम स्वामीत्व योजना. या योजनेंतर्गत देशातील खेड्यापाड्यातील प्रत्येक मालमत्तेचे प्रथमच डिजिटल मॅपिंग करुन लोकांना डिजिटल प्रॉपर्टी कार्ड दिले जात आहेत.
'इंडिया ड्रोन फेस्टिव्हल 2022' च्या उद्घाटन कार्यक्रमात पीएम मोदी म्हणाले की, 'पूर्वीच्या सरकारच्या काळात तंत्रज्ञान हा समस्येचा भाग मानला जात होता. त्यामुळे 2014 पूर्वीच्या कारभारात तंत्रज्ञानाच्या वापराबाबत उदासीनतेचे वातावरण होते. त्याचे सर्वाधिक नुकसान गरीब, वंचित, मध्यमवर्गीयांचे झाले.'
पीएम मोदी पुढे म्हणाले की, ''केदारनाथच्या पुनर्बांधणीचे काम सुरु झाले तेव्हा प्रत्येक वेळी तिथे जाणे माझ्यासाठी शक्य नव्हते. त्यामुळे मी ड्रोनच्या माध्यमातून केदारनाथच्या (Kedarnath) कामाचे निरीक्षण करायचो. आज सरकारी कामांचा दर्जा पहायचा असेल तर त्यांनी तिथे जावे.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.