PM Modi  Dainik Gomantak
देश

''द्रौपदी मुर्मू यांचे जीवन असाधारण आहे''

द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात होणार लढत

दैनिक गोमन्तक

भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. भारताच्या राज्यघटनेनुसार राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नव्या राष्ट्रपतींची निवड होणे अपेक्षित आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या ही निवडणूक लढणार आहेत.

भाजप आणि समर्थक पक्षांनी यासाठी भक्कम नियोजन केले असल्याचं ही स्पष्ट झाले आहे. त्यामूळे भाजपने त्या नक्की या निवडणूकीत विजयी होतील असे स्पष्ट केले आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याबद्दल बोलताना द्रौपदी मुर्मूचे यांचे जीवन असाधारण आहे, अशी स्तुती केली आहे.

पंतप्रधान म्हणाले की भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारखाच उत्साह आणि जोश मुर्मूमध्ये आहे. 2002 मध्ये कलाम यांची निवड झाली तेव्हा लोकांमध्ये असाच उत्साह होता. आणि त्यांची निवड निश्चित होईल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू आणि विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा हे दोनच उमेदवार रिंगणात आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. अध्यक्षपदासाठी 18 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत निवडणूक होणार आहे.

राष्ट्रपती निवडणुकीचे रिटर्निंग ऑफिसर, राज्यसभेचे सरचिटणीस पीसी मोदी यांनी 30 जून रोजी सांगितले होते की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एकूण ११५ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली होती, परंतु केवळ मुर्मू आणि सिन्हा यांचेच अर्ज वैध आढळले.

कोण आहे द्रौपदी मुर्मू ?

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजीद्रौपदी मुर्मूचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात झाला. बिरांची नारायण तुडू असे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. त्या संताल कुटुंबातील आहे, जो एक आदिवासी वांशिक गट आहे. मुर्मू या प्रदीर्घ काळापासून भाजपशी जोडलेल्या आहेत. द्रौपदी मुर्मू या आदिवासी वंशाची आहेत. त्यांनी ग्राऊंड झिरोपासून राजकारणात कामाला सुरुवात केली होती.

1997 मध्ये त्या रायरंगपूरमधून पहिल्यांदा नगर पंचायतीत नगरसेवक झाल्या. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूरमधून 2 वेळा आमदारही राहिल्या आहेत. त्या भाजपा आणि बिजू जनता दलाच्या (BJD) युती सरकारमध्ये मंत्रीही होत्या. द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. तसेच 2000 मध्ये स्थापन झाल्यापासून 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या त्या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल आहेत. राज्यपाल बनलेल्या त्या पहिल्या ओडिया नेत्या आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT