Prime Minister Narendra Modi inaugurated the second phase of Rupee Card through video conferencing 
देश

पंतप्रधान मोदी यांचे पुन्हा ‘जय जवान’

दैनिक गोमंतक

नवी दिल्ली : मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्या २६ नोव्हेंबर या दिवशीच देशात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या जैशे महंमदच्या चौघा दहशतवाद्यांना जम्मू-काश्‍मीरमध्ये कंठस्नान घालणाऱ्या व दिल्लीत त्याच गटाच्या दोन  दहशतवाद्यांची धरपकड करणाऱ्या सुरक्षा दलांच्या शौर्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुक्तपणे प्रशंसा केली. मोदी यांनी दिल्लीसह देशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. 


मोदी यांनी आज दुपारी घेतलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोवाल, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला सहभागी झाले होते. या बैठकीत दिल्ली व इतर महानगरांतील संवेदनशील भागांत सुरक्षेचा वेढा आवळण्याची व दहशतवादी हल्ल्याचा धोका असणाऱ्या राज्यांच्या सीमांवर अतिरिक्त गस्तीपथके तैनात करण्याची सूचना करण्यात आली. पंतप्रधानांनी ट्विटद्वारेही जवानांच्या शौर्याची प्रशंसा केली. मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांच्या कारवाया हाणून पाडून भारतीय जवानांनी पुन्हा आपल्या शौर्याचे प्रदर्शन जगाला घडविले, असे पंतप्रधानांनी म्हटले. त्यांनी हेही नमूद केले की सध्या पाकिस्तानात असलेल्या जैशे महंमदच्या चार दहशतवाद्यांचा खातमा करणे व मोठ्या प्रमाणावर शस्त्रे, दारूगोळा हस्तगत करत आमच्या जवानांनी मोठा संभाव्य संहार टाळला आहे. आमच्या सुरक्षा दल जवानांनी पुन्हा एकदा जबरदस्त शौर्य दाखविले आहे. 

‘रुपे कार्ड-२’चे उद्‌घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांच्यासह दुसऱ्या टप्प्यातील रूपे कार्डचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटन केले. कोरोनाच्या या संकटकाळात भारत आपल्या शेजारी मित्रांच्या मदतीसाठी सदैव सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यामुळे भूतानचे डेबीट-क्रेडिट कार्डधारक भारताच्या रूपे नेटवर्कचाही उपयोग करू शकतील. मोदी यांनी मागील वर्षी ऑगस्टमध्ये आपल्या भूतान दौऱ्यात रूपे कार्डच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन केले होते.

आणखी वाचा:

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT