Prime Minister Narendra Modi in Kedarnath Dainik Gomantak
देश

‘शाम करोति सह शंकरः’ म्हणत पंतप्रधान बाबा केदारनाथच्या चरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत केदारनाथ धाममध्ये पोहोचले.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Narendra Modi) आज कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत केदारनाथ (Kedarnath) धाममध्ये पोहोचले. पंतप्रधानांनी बाबा केदारनाथला भेट दिली आणि पूजा केली, त्यानंतर गुरु शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण देखील करण्यात आले आहे . यावेळी पीएम मोदी म्हणाले की, 'आदि शंकराचार्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार तुम्ही सर्वजण पाहत आहात. भारताच्या अध्यात्मिक समृद्धी आणि रुंदीचे हे एक अतिशय अथांग दृश्य आहे.'

पीएम मोदी म्हणाले की, आपल्या उपनिषदांमध्ये, आदि शंकराचार्यांच्या रचनांमध्ये अनेक ठिकाणी नेति-नेती सांगून जगाला जाणीव देण्यात आली आहे. रामचरित मानसकडेही बघितले तर या भावनेची पुनरावृत्ती त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने झाली आहे. रामचरित मानसात म्हटले आहे- 'अभिगत अकथ अपार, नेति-नेति नित निगम कहा', म्हणजेच काही अनुभव इतके अलौकिक, इतके अनंत असतात की ते शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. बाबा केदारनाथच्या आश्रयाने आल्यानंतर ही माझी भावना आहे.असे मत पंतप्रधानांनी मांडले आहे.

संस्कृतमध्ये शंकराचा अर्थ ‘शाम करोति सह शंकरः’ म्हणजेच जो कल्याण करतो, तो शंकर आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. हे आचार्य शंकर यांनी थेट प्रमाणित केले होते. त्यांचे जीवन जेवढे विलक्षण होते, तेवढेच ते सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी समर्पित होते.केदारनाथमध्ये शंकराचार्यांची 12 फूट उंच आणि 35 टन वजनाची मूर्ती बसवण्यात आली आहे. केदारनाथ, उत्तराखंड येथे स्थित आदिगुरू शंकराचार्यांची १२ फूट उंचीची मूर्ती म्हैसूरच्या शिल्पकारांनी क्लोराईट शिस्टपासून बनवली आहे. क्लोराईट स्किस्ट हा एक खडक आहे जो पाऊस, सूर्यप्रकाश आणि कठोर हवामानाचा सामना करण्यासाठी ओळखला जातो. या मूर्तीचे वजन 35 टन आहे. पर्यटन अधिकाऱ्यांनी सांगितले की, केदारनाथ मंदिर संकुलातील मूर्ती चमकण्यासाठी नारळाच्या पाण्याने पॉलिश करण्यात आले आहे.

पीएम मोदी म्हणाले, वर्षापूर्वी येथे झालेले नुकसान अकल्पनीय होते. इथे येणार्‍या लोकांना वाटायचे की हे आमचे केदारधाम पुन्हा उभे राहील का? पण माझा आतला आवाज सांगत होता की तो पूर्वीपेक्षा जास्त अभिमानाने उभा राहील. या आदिम भूमीवर शाश्वततेशी आधुनिकतेची जोडलेली ही विकासकामे म्हणजे भगवान शंकराच्या उत्स्फूर्त कृपेचे फलित असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.

तत्पूर्वी बुधवारी मुख्यमंत्र्यांनी केदारनाथला भेट देऊन पंतप्रधानांच्या आगमनासंदर्भातील व्यवस्थेचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी तीर्थ पुजारी आणि पांडा समाजाच्या प्रतिनिधींशी देवस्थानम बोर्ड बरखास्त करण्याची मागणीही केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

VIDEO: चौकाराच्या गैरसमजात तिलक वर्माने गमावली विकेट! पिचवरच थांबला अन् झाला रनआऊट, विंडीजच्या खेळाडूंना हसू आवरेना; गंभीर भडकला

SCROLL FOR NEXT