PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

Modi Cabinet: मोदी सरकारचा मोठा निर्णय, नॅशनल क्वांटम मिशनला दिली मंजूरी; पायरसी रोखण्यासाठी...

Modi Cabinet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

Manish Jadhav

Modi Cabinet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

पायरसी रोखण्यासाठी येत्या अधिवेशनात सिनेमॅटोग्राफ कायदा 2023 आणणार असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

याशिवाय, नॅशनल क्वांटम मिशनला मंजुरी मिळाल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले. त्यासाठी 6003 कोटी रुपयांची बजेट तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सांगितले की, पायरसीवर बंदी घालण्याची अनेक दिवसांपासून मागणी होती. सिनेमॅटोग्राफ ऍक्ट 2023 मध्ये कडक कायदे केले जातील आणि याचा चित्रपट जगत, कलाकार आणि चाहत्यांना मोठा फायदा होईल.

2031 पर्यंत क्वांटम मिशन

नॅशनल क्वांटम मिशनलाही केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. त्याची कालमर्यादा 2023-24 ते 2030-31 पर्यंत असेल.

क्वांटम तंत्रज्ञान ही भौतिकशास्त्राची एक शाखा आहे. या तंत्रज्ञानामध्ये सामान्य संगणक अनेक पटींनी कमी वेळेत अनेक पट जास्त डेटा प्रोसेस करु शकतो.

हे तंत्रज्ञान (Technology) दळणवळण, आरोग्य, फार्मा, वित्त, ऊर्जा, संरक्षण आणि डेटा सुरक्षा बाबींमध्ये वापरले जाऊ शकते.

चार वेगवेगळे हब बांधले जातील

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, क्वांटम मिशनसाठी चार वेगवेगळे हब बनवले जातील. त्यांचे संचालन विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे मिशन डायरेक्टर करतील. मिशनचे मार्गदर्शन करण्यासाठी एक प्रशासकीय मंडळ असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT