PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगळुरमध्ये इंडिया एनर्जी वीक 2023 चे उद्घाटन करणार आहेत. यावेळी E20 पेट्रोल देखील लॉन्च केले जाईल, जे 20 टक्के इथेनॉलपासून बनलेले आहे. याशिवाय पंतप्रधान सौरऊर्जेवर चालणारी सोलर कुकिंग सिस्टीमही सादर करणार आहेत. 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान ऊर्जा सप्ताह चालणार आहे.
दरम्यान, पीएम मोदी कर्नाटकातील तुमकुरू येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या राष्ट्रीय कंपनीचा हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण करतील. हा आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना आहे. 20 वर्षांत येथे 1000 हून अधिक हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत.
आशियातील हा सर्वात ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर कारखाना आहे, जो हेलिकॉप्टर उत्पादन क्षमता आणि इको-सिस्टम वाढवेल. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, पुढील 20 वर्षात येथे 4 लाख कोटींची उलाढाल असलेली 1000 हून अधिक हेलिकॉप्टर बनवली जातील.
615 एकरमध्ये असलेला हा कारखाना सुरुवातीला लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) तयार करेल. LUH हे स्वदेशी बनावटीचे आणि विकसित केलेले 3-टन श्रेणीचे सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आहे. सुरुवातीला या कारखान्यात दरवर्षी सुमारे 30 हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत.
त्यानंतर दरवर्षी त्याची क्षमता 60 ते 90 हेलिकॉप्टरच्या दराने वाढवता येईल. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार LUH ची उड्डाण चाचणी करण्यात आली आहे.
दरम्यान, बंगळूरमध्ये 3 दिवस चालणाऱ्या ऊर्जा सप्ताहाचे उद्दिष्ट भारताच्या अक्षय ऊर्जेच्या दिशेने वाढणाऱ्या हालचालींवर प्रकाश टाकणे आहे. यात जगभरातील 30 हून अधिक मंत्री सहभागी होणार आहेत. 30,000 हून अधिक प्रतिनिधी आणि 500 प्रवक्ते भारताच्या ऊर्जा आणि भविष्याशी संबंधित आव्हाने आणि संधींवर चर्चा करण्यासाठी येतील.
PM मोदी E20 पेट्रोल लाँच करणार
या दरम्यान PM मोदी 20 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले E20 पेट्रोल लॉन्च करतील. E20 पेट्रोल 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विकले जाईल. सरकारने 2025 पर्यंत फक्त E20 पेट्रोलची विक्री करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
याशिवाय पंतप्रधान पेट्रोल पंपावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी बनवलेला खास ड्रेस 'अनबॉटल्ड' देखील सादर करतील. इंडियन ऑइलने प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून हा ड्रेस तयार केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.