Narendra Modi, Yogi Aditynath Dainik Gmantak
देश

पंतप्रधान मोदींनी घेतला अयोध्या विकास प्रकल्पाचा आढावा

बैठकीत अयोध्याच्या विकासाशी संबंधित प्रकल्पातील विविध बाबींवर उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी विकासाच्या मॉडेलचे एक सादरीकरण केले आहे

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमांत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत बैठक घेतली आहे. या बैठीद्वारे पंतप्रधानांनी अयोध्या विकास प्रकल्पाचा आढावा घेतला आहे . या बैठीकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या नगरी ही प्रभू श्रीरामांची नगरी असून हे शहर आध्यात्मिक आणि जागतिक पर्यटन केंद्र तसेच शाश्वत स्मार्ट सिटी म्हणून विकसित केले जावे अशी भावना व्यक्त केली आहे.

या आढावा बैठकीला केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा, उत्तर प्रदेशचे दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच उत्तर प्रदेश सरकारचे अनेक वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बैठकीत अयोध्याच्या विकासाशी संबंधित प्रकल्पातील विविध बाबींवर उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी विकासाच्या मॉडेलचे एक सादरीकरण केले आहे. तसेच अयोध्याच्या विकासाची दृष्टी म्हणजे आध्यात्मिक केंद्र, जागतिक पर्यटन केंद्र आणि शाश्वत स्मार्ट सिटी विकसित करणे अशी आहे.

या बैठकीत पंतप्रधानांना अयोध्येत दळणवळण सुधारण्याशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासाच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली असून दरम्यान विमानतळ विकास, रेल्वे स्थानक, बसस्थानक, रस्ते आणि महामार्ग संबंधित प्रकल्पांवर सविस्तर चर्चाही झाली असल्याची माहिती मिळतीय. तसेच येणाऱ्या भक्तांसाठी आश्रमशाळा, हॉटेल्स आणि विविध राज्यांची इमारती असतील. तसेच बैठकीत आधुनिक पर्यटन सुविधा केंद्र आणि जागतिक स्तरावरील संग्रहालय तयार करण्याबाबतही चर्चा करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना ''अयोध्या ही प्रत्येक भारतीयांची सांस्कृतिक जाणीव असलेले शहर आहे, तेथील प्रकल्पांमध्ये उत्तम परंपरा आणि सर्वोत्कृष्ट विकास परिवर्तनाचे प्रदर्शन झाले पाहिजे.तसेच अयोध्याची ओळख साजरी करण्यासाठी, सांस्कृतिक चैतन्य अभिनव मार्गाने जपण्यासाठी त्यांनी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. '' अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT