Indian Citizens
Indian Citizens Dainik Gomantak
देश

युक्रेनमधून भारतीयांना काढण्यासाठी 'Air Force' उतरणार मैदानात

दैनिक गोमन्तक

युक्रेनमधील युद्धग्रस्त शहरांमध्ये आणि सीमा भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारत सरकार युध्दपातळीवर काम करत आहे. पंतप्रधान मोदीही या संपूर्ण घटनाक्रमावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. (Prime Minister Modi Has Asked The Air Force To Join In Expelling Indians From Ukraine)

दरम्यान, ऑपरेशन गंगा अंतर्गत युद्धग्रस्त भागातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी भारतीय हवाई दलालाही या ऑपरेशनमध्ये सामील होण्यास सांगितले आहे. हवाई दलाच्या विमानांची भर पडल्याने भारतीयांना परत येण्याच्या प्रक्रियेला वेग येईल आणि त्यांची संख्याही वाढेल असं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर भारतातून पाठवण्यात येणारी मदत सामग्रीही वेगाने पोहोचेल. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीय हवाई दलाची अनेक C-17 विमाने आज उड्डाण करण्यास सुरुवात करु शकतात.

तसेच, आज दुपारपर्यंत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी किमान तीन उड्डाणे नियोजित आहेत. यामध्ये बुखारेस्टमधून दोन फ्लाइट आणि हंगेरीची राजधानीतून एका फ्लाइटचा समावेश आहे. ही उड्डाणे मुंबई आणि दिल्लीला पोहोचतील. ऑपरेशन गंगा (Operation Ganga) अंतर्गत आज सकाळी 9 वे विमान भारतात परतल्याची घोषणा करताना, केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर (Dr. S. Jaishankar) यांनी ट्विट करत म्हटले की, आपले नागरिक सुरक्षितरित्या जोपर्यंत भारतात येत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.

ऑपरेशन गंगा अंतर्गत येणारे प्रवासी

  • पहिल्या फ्लाइटपासून 128

  • दुसऱ्या फ्लाइटमधून 216

  • तिसऱ्या फ्लाइटमधून 182

  • चौथ्या फ्लाइटमधून 240

  • पाचव्या फ्लाइटमधून 249

  • 6 व्या फ्लाइटमधून 198

  • सातव्या फ्लाइटमधून 240

  • आठव्या फ्लाइटमधून 250

  • नवव्या फ्लाइटमधून 219

शिवाय, आतापर्यंत एकूण 1922 प्रवासी आले आहेत. प्रथम 241 प्रवासी आले जे एअर इंडियाचे (Air India) होते. त्यानंतर 182 भारतीय युक्रेनच्या विमानातून आले. त्यानंतर भारत सरकारने एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस आणि इंडिगोला भारतीयांना सुरक्षितरित्या मायदेशात आणण्यासाठी कार्यरत केले. त्यानंतर आता स्पाइसजेटची उड्डाणे कालपासून सुरु झाली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donation: उल्‍हास वेर्लेकर कुटुंबियांकडून गोव्‍यातील दहा संस्‍थांना प्रत्‍येकी एक लाखाची देणगी

GI Tag For Goa's Urrak: मानकुराद, फेणी, बिबिंकानंतर आता हुर्राकला लवकरच मिळणार GI मानांकन

South Goa : दक्षिणेत काँग्रेसचा ७ हजारांच्‍या मताधिक्‍याने विजय शक्‍य; पक्षाच्या विश्‍लेषकांचा दावा

Bicholim News : खाण क्षेत्रातून गाव वगळा जनतेची मागणी ; मंदिरे, घरे, जलस्रोत धोक्‍यात

Parshuram Jayanti: प्रभू परशुरामाला गोमंतभूमी जनक का म्हटले जाते, काय आहे गोव्याशी संबंध?

SCROLL FOR NEXT