President Draupadi Murmu Dainik Gomantak
देश

Budget Session: राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान संसदेत 'जय श्री राम' च्या घोषणा; PM मोदींनी असा दिला प्रतिसाद

Budget Session: निती आयोगाच्या म्हणण्यानुसार, एका दशकाच्या कार्यकाळात सुमारे 25 कोटी देशवासी गरीबीतून बाहेर आले आहेत.

दैनिक गोमन्तक

Budget Session: आज 31 जानेवारीला २०२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले आहे. त्यांनी केलेल्या अभिभाषणात सरकारने केलेल्या कामाचा उल्लेख करताना त्यांनी कौतुक केले. त्यानंतर सभागृहात मोठा जोश पाहायला मिळाला आहे. चला जाणून घेऊयात राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात कोणते मुद्दे मांडले आहेत.

  • संसदेची ही वास्तू अमृत कालाच्या सुरुवातीला बांधली गेली आहे. ही नवीन इमारत धोरणांची पूर्तता करेल, असा विश्वास असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

  • राम मंदिराची निर्मिती ही अनेक शतकांपासूनची आकांक्षा होती. ही आकांक्षा आता पूर्ण झाली आहे. असे म्हणताच सभागृहात जय श्री राम अशा घोषणा देण्यात आल्या आणि टेबल वाजवून आनंद व्यक्त केल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील साथ दिल्याचे पाहायला मिळाले.

  • गरीबी कमी करण्याचे किंवा नष्ट करण्याचे काम या सरकारने केले आहे. निती आयोगाच्या म्हणण्यानुसार, एका दशकाच्या कार्यकाळात सुमारे 25 कोटी देशवासी गरीबीतून बाहेर आले आहेत.

  • जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत शंका होत्या पण आज तो इतिहास आहे. राष्ट्रपती म्हणाले की, याच संसदेने तिहेरी तलाकविरोधात कठोर कायदा केला आहे.

  • संसदेने शेजारील देशांतून येणाऱ्या अत्याचारित अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणारा कायदा केला आहे.

  • सरकारने वन रँक, वन पेन्शनही लागू केली आहे.

अशा आशयाचे मुद्दे राष्ट्रपतींच्या भाषणात ऐकायला मिळाले आहेत. या भाषणादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून उत्सफुर्त प्रतिसाद दिल्याचा पाहायला मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT