Mamata Banerjee & Sharad Pawar Dainik Gomantak
देश

Presidential Election: बैठकीपूर्वी ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट

राष्ट्रपती निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची उद्या दिल्लीत बैठक होणार आहे.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रपती निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आज दुपारी 4.30 वाजता दिल्लीत पोहोचत आहेत. ममता बॅनर्जी यांची आज कोणतीही नियोजित बैठक नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. बुधवार, 15 जून रोजी कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये दुपारी 3 वाजता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत विरोधी पक्षांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी त्या असतील. (president election mamata banerjee met ncp sharad pawar before opposition meet on presidential candidate)

दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच उमेदवार निवडीसाठी पक्षांतर्गत चर्चेला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारावर सर्वसहमतीचे एकमत तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बुधवारी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीपूर्वी दोन्ही नेत्यांची भेट झाली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे. तर मतमोजणी 21 जुलै रोजी होणार आहे.

काँग्रेसही सहभागी होणार

TMC प्रमुख ममता बॅनर्जी यांनी कॉन्स्टिट्यूशन क्लब, दिल्ली येथे उद्या दुपारी 3 वाजता बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत काँग्रेस सहभागी होणार आहे. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, रणदीप सिंग सुरजेवाला सहभागी होणार आहेत.

18 जुलै रोजी निवडणूक

राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत, इलेक्टोरल कॉलेजमधील 4,809 सदस्य- खासदार आणि आमदार - विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा उत्तराधिकारी निवडतील. खरं तर अध्यक्षाची निवड अप्रत्यक्षपणे इलेक्टोरल कॉलेजमधून होत असते. ज्यामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संसदेचे आणि विधानसभेचे निवडून आलेले सदस्य समाविष्ट आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim Accident: भाड्याची 'थार' ठरली काळ...! मोरजी अपघातात महिलेचा मृत्यू, दोघे जखमी; हरियाणाचा चालक घटनास्थळावरुन फरार

VIDEO: "हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये", जुन्या वादाला पुन्हा फोडणी! हरभजन सिंहला श्रीसंतचे थेट बॉक्सिंग चॅलेंज

Goa Congress: काँग्रेसची 22 सप्टेंबरपासून गोवा राखण यात्रा; युरी आलेमाव यांची घोषणा, पेडण्यापासून काणकोणपर्यंत आयोजन

Chhattisgarh Woman Assault: आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, मग हात पाय बांधून जबरदस्तीनं मुंडण, अन्...; चार मुलांसमोर नराधम बापाची आईवर क्रूरता

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

SCROLL FOR NEXT