आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी पहिल्या दिवशी 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी एका उमेदवाराचा अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या अभावी फेटाळण्यात आला आहे. लालू प्रसाद यादव यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेची अधिसूचना बुधवारी जारी करण्यात आली. यासोबतच देशात राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रियाही सुरु झाली आहे. देशातील सर्वोच्च घटनात्मक पदासाठी उमेदवार 29 जूनपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. (president election 11 file nominations on day first one paper rejected)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील (Bihar) सारण येथील लालू प्रसाद यादव नामक व्यक्तीचाही नामांकन यादीत समावेश होता. मात्र त्याचे नामाकंन नाकारण्यात आले आहे. कारण त्याने मतदार यादीत आपले नाव दर्शविणाऱ्या कागद पत्राची प्रत जोडली नव्हती.
या राज्यांतील उमेदवार
बुधवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार हे दिल्ली, महाराष्ट्र (Maharashtra), बिहार, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील होते. 18 जुलै रोजी देशाच्या नवीन राष्ट्रपतीची निवडणूक होणार आहे, ज्यामध्ये 4,809 मतदान होणार आहे. आवश्यकता भासल्यास 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. ही अधिसूचना 15 जूनपासून लागू होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 29 जूनपर्यंत असेल. 30 जूनपर्यंत त्यांची छाननी केली जाईल आणि उमेदवार 2 जुलैपर्यंत त्यांचे अर्ज परत करु शकतील.
24 जुलै रोजी मुदत संपत आहे
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत असून नवीन राष्ट्रपती 25 जुलैपर्यंत शपथ घेणार आहेत. अशा परिस्थितीत 24 जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतीची निवड होणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करताना याची काळजी घेतली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.