Prasidh Krishna Vs Joe Root Dainik Gomantak
देश

IND vs ENG: 'त्याला डिवचणं आमच्या प्लानचा भाग होता...'; जो रुटसोबतच्या वादावर प्रसिद्ध कृष्णाने सोडले मौन!

Prasidh Krishna Vs Joe Root: गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि इंग्लिश फलंदाज जो रुट (Joe Root) यांच्यात झालेली बाचाबाची चर्चेचा विषय ठरली.

Manish Jadhav

Prasidh Krishna Vs Joe Root: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल (Oval) कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि इंग्लिश फलंदाज जो रुट (Joe Root) यांच्यात झालेली बाचाबाची चर्चेचा विषय ठरली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कृष्णाने या वादावर मौन सोडत एक मोठा खुलासा केला.

रुटसोबत काय घडले?

बीबीसी (BBC) शी बोलताना प्रसिद्ध कृष्णा म्हणाला, "रुटने असे का केले हे मला माहीत नाही. मी फक्त एवढेच म्हटले होते की, 'तू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेस आणि त्यानंतर हे संभाषण शिवीगाळ (Abusive language) आणि वादात बदलले." कृष्णाने कबूल केले की, जो रुटला डिवचण्याची (Sledging) योजना भारतीय संघाने आधीच आखली होती, पण अनुभवी खेळाडूकडून अशी तीव्र प्रतिक्रिया (Strong reaction) येईल अशी त्याला अपेक्षा नव्हती.

बुमराहच्या अनुपस्थितीवरही भाष्य

यावेळी कृष्णाला संघातील मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) अनुपस्थितीबद्दलही विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, "जसप्रीत बुमराह खेळो वा न खेळो, आम्हाला आमच्या भूमिकेची (Role) जाणीव आहे. माझी निवड इथे झाली आहे, कारण मी माझे काम करु शकतो. जर मी सामना खेळू शकलो नाहीतर मला माझ्या रणनीतीवर (Strategy) काम करावे लागेल. मी इथे खेळण्यासाठी आलो आहे. माझ्यासाठी ही एक प्रक्रिया आहे, केवळ कामगिरी नाही."

सामन्याची सद्यस्थिती

  • भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व: सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. भारताच्या 224 धावांना उत्तर देताना इंग्लंडचा संघ 247 धावांवर सर्वबाद झाला.

  • कृष्णा-सिराजचा पराक्रम: प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) या दोघांनीही प्रत्येकी 4-4 बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले.

  • भारताची आघाडी: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 2 बाद 75 धावा केल्या होत्या आणि एकूण 52 धावांची आघाडी घेतली होती. यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) अर्धशतक झळकावून भारताची बाजू मजबूत केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahadevi Elephant: जनतेनं संघर्ष टाळावा, आमच्यासोबत उभं राहावं; वनतारानं स्पष्ट केली भूमिका; नेमकं काय केलंय आवाहन?

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT