Pramod Tiwari-Rajani Patil: काँग्रेसने उत्तर प्रदेशातील आपले ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांची राज्यसभेतील उपनेतेपदी आणि रजनी पाटील यांची व्हिप म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ही माहिती दिली आहे.
रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी प्रमोद तिवारी यांची राज्यसभेतील पक्षाचे उपनेतेपदी आणि रजनी पाटील यांची व्हिप म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे.
राज्यसभेचे अध्यक्ष (Jagdeep Dhankhar) यांना या नियुक्त्यांची माहिती देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पक्षाचे नेते म्हणजेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. रमेश चीफ व्हिपच्या भूमिकेत आहेत.
दरम्यान, आनंद शर्मा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्याने पक्षाकडे उपनेते नव्हते. उत्तर प्रदेशचे असलेले तिवारी हे राजस्थानचे राज्यसभा सदस्य आहेत.
महाराष्ट्राच्या असलेल्या रजनी पाटील या त्यांच्याच राज्यातून राज्यसभेच्या सदस्य आहेत. 13 मार्चपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या दोन दिवस आधी काँग्रेसने (Congress) या नियुक्त्या केल्या आहेत.
तसेच, प्रमोद तिवारी हे तेच नेते आहेत, ज्यांनी फेब्रुवारीमध्ये अध्यक्षांना विचारले होते की तुम्ही किती वेळा प्रेमात पडला आहात.
गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणातील काही शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले होते. यावर काँग्रेसच्या खासदारांनी नाराजी व्यक्त करत सभागृहात गदारोळ केला.
त्याचबरोबर, मुद्दा मांडताना प्रमोद तिवारी यांनी चर्चेत अध्यक्षांना सांगितले होते की, शेरो शायरी ही प्रेमाने आणि आपुलकीने केली जाते, ती काढू नये. यावर अध्यक्ष म्हणाले होते की, शेर, कविता प्रेमाने असते की प्रेम असते की प्रेम कविता असते हे मला समजत नाही.
यावर, काँग्रेस खासदार तिवारी यांनी अध्यक्षांना विचारले होते की, तुम्ही कितीवेळा प्रेमात पडला आहात. तिवारी म्हणाले होते की, साहेब मला सांगा तुम्ही कितीवेळा प्रेमात पडला आहात. त्यामुळे सभागृहाचे वातावरण थोडे हलके झाले. मात्र, यावर अध्यक्षांनी कोणतेही उत्तर दिले नाही. पण त्यावर ते हसले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.