Prajwal Revanna Convicted: कर्नाटकमधील बहुचर्चित माजी खासदार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) याला अखेर एका बलात्कार आणि लैंगिक छळाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) शुक्रवारी (1 ऑगस्ट) हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर कोर्टातच उपस्थित असलेल्या रेवन्नाला अश्रू अनावर झाले आणि तो ढसाढसा रडू लागला. लवकरच कोर्टाकडून त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
प्रज्वल रेवन्नावर अनेक महिलांशी (Women) लैंगिक गैरवर्तन आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात एकूण चार गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी एका प्रकरणात आज त्याला दोषी ठरवण्यात आले. इतर प्रकरणांवरही कोर्ट लवकरच निर्णय देऊ शकते.
आरोप: प्रज्वल रेवन्नावर त्याच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. याशिवाय, बंगळूरुमधील सार्वजनिक ठिकाणी अनेक पेन ड्राईव्ह (Pen Drives) सापडले होते, ज्यात 3 हजार ते 5 हजार व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये प्रज्वल अनेक महिलांसोबत लैंगिक गैरवर्तन करताना दिसत होता. धक्कादायक म्हणजे, या व्हिडीओमध्ये महिलांचे चेहरेही ब्लर केलेले नव्हते.
चौकशी आणि कारवाई: हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात प्रचंड गदारोळ झाला होता. प्रकरण वाढताना पाहून कर्नाटक सरकारने तपासासाठी एसआयटी (SIT) म्हणजेच विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. एसआयटीच्या तपासानंतर प्रज्वलवर बलात्कार, छेडछाड, ब्लॅकमेलिंग आणि धमकी देण्याच्या आरोपांखाली 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे, तो महिलांवर बलात्कार केल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवत असल्याचेही तपासात समोर आले होते.
प्रज्वल रेवन्ना हा देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. Devegowda) यांचा नातू आहे. त्याचे आजोबा पंतप्रधान, काका मुख्यमंत्री आणि वडील मंत्री राहिलेले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून तो जनता दल (एस) (JDS) या पक्षात राजकारण करत होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्याने हासन (Hassan) मतदारसंघातून विजय मिळवला होता, मात्र 2024 च्या निवडणुकीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
प्रज्वल रेवन्नाचे सेक्स टेप प्रकरण 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानच समोर आले होते. 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर कर्नाटक (Karnataka) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत काँग्रेस सरकारला पत्र लिहिले, ज्यानंतर सरकारने तपासाचे आदेश दिले होते. प्रज्वलला दोषी ठरवल्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात आणि समाजात या निर्णयावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.