Politics  Dainik Gomantak
देश

गेल्या सात वर्षात तुम्ही काय केले ? प्रियंका गांधींचा 'भाजप'ला प्रश्न

वाढत्या महागाईवर केंद्रावर निशाणा साधत त्या म्हणाल्या की, "खाण्यापिण्याच्या वस्तू आणि इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत."

दैनिक गोमन्तक

Politics: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी रविवारी वाढत्या महागाईवर केंद्रावर निशाणा साधला. त्यांनी जयपूरमध्ये (Jaipur) आयोजित 'मेहंगाई हटाओ रॅलीत' भाषण केले.

"तुम्ही जेव्हा त्यांना (भाजप) निवडून दिले तेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. काँग्रेसने (Congress) गेल्या 70 वर्षांत काहीही केले नाही, असे ते म्हणायचे. पण मला त्यांना विचारायचे आहे की, गेल्या सात वर्षात तुम्ही काय केले ? तुम्ही शिक्षणासाठी बांधलेली एक संस्था दाखवा. तुम्ही उड्डाण करण्यासाठी वापरत असलेले विमानतळही काँग्रेसनेच बांधले होते. आज सरकारला काँग्रेसने बनवलेले सर्व काही विकायचे आहे," असे म्हणत प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) जयपूर मधील मेहंगाई हटाओ रॅलीत भाजपवर कडाडल्या.

वाढत्या महागाईवर केंद्रावर निशाणा साधत त्या म्हणाल्या की, "खाण्यापिण्याच्या वस्तू आणि इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, पण सर्वसामान्यांचे कोणीच ऐकत नाही. आज तुम्ही इथे आहात कारण एका एलपीजी सिलिंडरची किंमत सुमारे ₹1000 आहे. मोहरीच्या तेलाची किंमत सुमारे 200 रुपये प्रति लिटर आहे, पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत, आणि सामान्य माणसांना होणारा त्रास कोणीही ऐकत नाही."

यावेळेस त्यांनी योगी सरकारवर सुद्धा निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "यूपीचे योगी आदित्यनाथ सरकार (Yogi Government) जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करत आहे परंतु शेतकऱ्यांना खत देत नाही."

"केंद्रातील आजचे सरकार फक्त खोटे बोलत आहे. हे सरकार काही उद्योगपतींसाठी काम करत आहे. उत्तर प्रदेश सरकार जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र, तेच सरकार शेतकऱ्यांना (Farmers) खत पुरवू शकत नाही," असा त्यांनी आरोप केला.

या रॅलीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT