PM Narendra Modi  Dainik Gomantak
देश

12 जुलै रोजी पंतप्रधान मोदींचा बिहार अन् झारखंड दौरा

पंतप्रधान मोदींचा 16 जुलैला यूपीला जाण्याचा कार्यक्रम असणार आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या 12 जुलै रोजी बिहार आणि झारखंडला भेट देणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदींचे संपूर्ण लक्ष झारखंडमधील देवघरवर असणार आहे. पीएम मोदी देवघरमध्ये अनेक योजनांचे वाटप करणार आहेत तसेच तेथील रोड शोमध्येही सहभागी होणार आहेत. यासोबतच पीएम मोदी देवघरमध्ये सभेलाही उपस्थित राहणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदींचा 16 जुलैला यूपीला जाण्याचा कार्यक्रम असणार आहे. (PM Narendra Modi visit to Bihar and Jharkhand on July 12)

पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमधील (Jharkhand) देवघर येथे एम्स आणि विमानतळाचे उद्घाटन करतील. यासोबतच पीएम मोदी देवघरमध्ये रोड शो करतील. यासोबतच पीएम मोदी यादरम्यान एका मोठ्या रॅलीमध्ये सहभागी होणार असून जनतेला संबोधित करणार आहेत. पीएम मोदी बाबा वैद्यनाथ धामलाही भेट देतील आणि बाबा भोलेनाथचे दर्शन घेणार आहेत.

12 जुलै रोजी पंतप्रधान मोदींचा बिहारमध्ये कार्यक्रम आहे. पंतप्रधान मोदी थेट देवघरहून पाटण्याला जाणार आहेत, जिथे ते बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला उपस्थित राहतील.

त्याचवेळी, 16 जुलै रोजी पीएम मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जातील. यापूर्वी पीएम नरेंद्र मोदींचा 12 जुलैलाच यूपीला जाण्याचा कार्यक्रम होता. पीएम मोदी जालौनमध्ये बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे उद्घाटन करतील. 296 किमी लांबीचा बुंदेलखंड एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशातील चित्रकूट आणि इटावा जिल्ह्यांना जोडला जाणार आहे. पाच द्रुतगती मार्ग असलेले उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT