PM Narendra Modi Varanasi Security Breach Dainik Gomantak
देश

PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, वाराणसीत तरुणाने वाहनाच्या ताफ्यासमोर मारली उडी

PM Narendra Modi Varanasi Security Breach: वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे.

Manish Jadhav

PM Narendra Modi Varanasi Security Breach: वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रुद्राक्ष केंद्रावरुन विमानतळाकडे रवाना झाले.

यादरम्यान एका तरुणाने त्यांच्या ताफ्यासमोर उडी मारली. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यापासून अवघ्या 10 फूट अंतरावर होता.

मात्र, हे पाहताच पोलीस तात्काळ पंतप्रधानांच्या ताफ्याजवळ पोहोचले. सावधगिरीने त्यांनी तरुणाला पकडले. सध्या त्याची चौकशी सुरु आहे.

हा तरुण भाजपचा कार्यकर्ता आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ताब्यात घेण्यात आलेला तरुण हा गाझीपूर जिल्ह्यात राहणारा भाजपचा कार्यकर्ता आहे. भारतीय लष्करात (Indian Army) नोकरीच्या मागणीबाबत त्याला पंतप्रधानांची भेट घ्यायची होती.

मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. झडतीदरम्यान एसपीजीला त्याच्याकडून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कार्यक्रमाचा पास मिळाला.

आतापर्यंत 9 वेळा पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाली

पीएम मोदींच्या सुरक्षेत चूक होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी जवळपास 9 वेळा त्यांच्या सुरक्षेत झाला होता. 30 एप्रिल रोजी कर्नाटकातील (Karnataka) म्हैसूरमध्ये रोड शो दरम्यान पीएम मोदींच्या दिशेने मोबाईल फेकण्यात आला होता.

यापूर्वी 19 जानेवारीला मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील व्हीव्हीआयपी परिसरात 38 वर्षीय व्यक्ती घुसली होती. फिरोजपूरमध्ये सर्वात मोठे प्रकरण समोर आले होते.

5 जानेवारी 2022 रोजी पीएम मोदींचा ताफा 15-20 मिनिटांसाठी फ्लायओव्हरवर थांबला होता. शेतकऱ्यांनी पुढे रास्ता रोको केला होता.

वाराणसीत तीन कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते

पंतप्रधान मोदी शुक्रवारी वाराणसीच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तीन कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी पंतप्रधान मोदींनी 450 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली.

या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर हेही मंचावर होते. त्यांनी गंजारी येथे जाहीर सभाही घेतली. यावेळी, त्यांनी रुद्राक्ष केंद्रात 16 निवासी शाळांचे उद्घाटन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT