PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

PM Narendra Modi: भारताला पोलाद निर्मितीचे हब बनविणार; गुजरातमध्ये 60 हजार कोटींच्या प्रकल्पाचे भूमीपुजन

देशातील पोलाद उद्योग आता जगात सर्वात मोठा; वर्षाला दीड लाख टन कच्च्या पोलादाची निर्मिती होणार

गोमन्तक डिजिटल टीम

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरातमधील हजिरा येथे 60 हजार कोटी रूपयांच्या आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडियाच्या विस्तार योजनेचे अनावरण केले. या पोलाद प्रकल्पाच्या विस्तारामुळे गुंतवणूक तर वाढेलच पण भविष्यात रोजगाराच्या अनेक संधींचे द्वार खुले होणार आहे.

मोदी म्हणाले, पोलाद उद्योग जेव्हा मजबूत होतो तेव्हा पायाभुत सुविधांना देखील बळ मिळते. पोलाद उद्योगाचा विस्तार होणे म्हणजे, रस्ते, रेल्वे, विमानतळे आणि बंदरांचा विकास, विस्तार होतो. गेल्या आठ वर्षातील प्रयत्नांमुळे भारतातील पोलाद उद्योग हा जगातील सर्वात मोठा पोलाद उत्पादक उद्योग बनला आहे.

या उद्योगात विकासाच्या अनेक शक्यता आहेत. संपुर्ण जग आपल्याकडे आशेने पाहत आहे. भारत जगातील सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याच्या दिशेने वेगाने प्रवास करत आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक वातावरण तयार व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

मोदी म्हणाले, पुर्वी आपण लढाऊ विमानांच्या पोलादासाठी परदेशातून आयातीवर अवलंबून होतो. देशातील पोलाद उद्योगाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या पोलाद उद्योगामुळे भारताचे पोलादाबाबतचे परदेशावरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

दरम्यान, आर्सेलर मित्तल आणि निप्पॉन स्टीलच्या या संयुक्त प्रकल्पातून वर्षाला 90 लाख टन कच्च्या पोलादाचे उत्पादन होत होते, ती क्षमता या विस्तारामुळे आता वर्षाला दीड लाख टन इतकी होणार आहे. या कंपनीने पर्यावरण विषयक परवानग्या यापुर्वीच घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT