PM Narendra Modi Speech Dainik Gomantak
देश

PM Narendra Modi Speech: 'मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल...' पंतप्रधानांनी मणिपूरवासियांना दिला विश्वास

PM Narendra Modi Speech: आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

Manish Jadhav

PM Narendra Modi Speech: आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, मणिपूरमध्ये जे काही चाललं आहे ते दुर्दैवी असून दोषींना कडक शिक्षा देण्यात येईलं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

मणिपूरमध्ये लवकरचं शांतीचा सूर्य उगवेल. मणिपूरच्या पाठीमागे संपूर्ण देश उभा आहे, असंही ते म्हणाले. मणिपूरमधील आजची परिस्थिती ही कॉंग्रेसच्या काळात निर्माण झाल्याचा आरोपही यावेळी पंतप्रधान मोदींनी केला. मात्र, मोदींच्या मणिपूरवरील निवेदनाआधीच विरोधकांनी सभात्याग केला होता.

दरम्यान, मणिपूरच्या (Manipur) मुद्द्यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावर बोलताना पंतप्रधानांनी मणिपूरची घटना दुर्दैवी असल्याचं सांगितलं.

त्यासोबतच संसदेत भारतमातेबद्दल जे काही बोलण्यात आले तेही दुर्दैवी असल्याचं सांगत त्यांनी राहुल गांधीसह कॉंग्रेसवर टीकास्त्र डागले.

मणिपूरमध्ये महिलांसोबत जे काही झालं ते चुकीचं झालं असून आरोपींना कडक शिक्षा देणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. मोदी म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मणिपूरवर सविस्तरपणे माहिती दिली आहे.

मणिपूरवर सविस्तर चर्चा करण्यासाठी प्रस्ताव दिला. आता मी मणिपूरवासियांना सांगतोय की, देश तुमच्या पाठीमागे सदैव आहे. लवकरच राज्यात शांतता नांदेल.

मणिपूर मुद्द्यावरून विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, सत्तेत नसल्यानंतर विरोधकांची काय अवस्था होते ते दिसतयं. काही लोक भारतमातेच्या मृत्यूचं वक्तव्य करतात.

हे ज्यांच्या मनात आहे तेच त्यांच्या कृतीत येते. वंदे भारत गीताचेही त्यांनी तुकडे केले. अकाल तख्तावर हल्ला करणारे आज आम्हाला प्रश्न विचारत आहेत. विरोधकांना केवळ मणिपूरच्या मुद्यावरुन राजकारण करायचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Racing Festival: ‘गोवा स्ट्रीट रेस’ वरून नवा वाद! सरकारी कराराचे उल्लंघन होत असल्याचा दावा

Chimbel Survey: चिंबलमधील 'तोयार'चे सर्वेक्षण पूर्ण! सरकारकडे अहवाल होणार जमा; मुख्‍यमंत्र्यांच्‍या भूमिकेकडे लक्ष

Ind Vs NZ T20: चौथ्या T20 साठी 2 बदल? संजू सॅमसन, कुलदीपबाबत मोठा निर्णय; कोण असणार अंतिम संघात?

Goa Politics: खरी कुजबुज; गोवा दूध उत्पादक संघ जीवंत आहे का?

Goa News: 2050 पर्यंत गोव्‍यात 100% नवीकरणीय ऊर्जा! CM सावंतांचे प्रतिपादन; कॅनडा, जपान, दक्षिण कोरियाशीही सहकार्य करार

SCROLL FOR NEXT