Narendra Modi Exam Reform Task Force Dainik Gomantak
देश

Narendra Modi Exam Reform Task Force: विद्यार्थ्यांच्या आक्रोशानंतर मोदी सरकारचे मोठे पाऊल; नंदन नीलेकणी यांच्याकडे 'टास्क फोर्स'ची धुरा

Nandan Nilekani Exam Reform Task Force: ‘नीट’च्या पेपरफुटीनंतर कॉक्रोच जनता पक्षाने जंतरमंतरवर ३६ दिवस आंदोलन केले. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता.

दैनिक गोमन्तक डिजिटल

नवी दिल्ली: परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चाधिकार कृती दलाची (टास्क फोर्स) स्थापना केली आहे. ‘‘विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सातत्याने विविध उपाय योजत असून, त्यांच्या भविष्याशी जे खेळतील, त्यांना तुरुंगात जावे लागेल,’’ असे मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

‘नीट’च्या पेपरफुटीनंतर कॉक्रोच जनता पक्षाने जंतरमंतरवर ३६ दिवस आंदोलन केले. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. या राजीनाम्यानंतर ‘सीजेपी’ने आंदोलन मागे घेतले असून, त्या पार्श्वभूमीवर या कृती दलाची स्थापना केली आहे. मोदी यांनी इन्स्टाग्रामद्वारे दिलेल्या व्हिडिओ संदेशामध्ये ही माहिती दिली. या कृती दलामध्ये तज्ज्ञांचा समावेश केला आहे. देशातील परीक्षा पद्धती अधिकाधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी हे कृती दल सूचना करेल, असे मोदी म्हणाले.

विधेयक

प्रश्नपत्रिकाफुटीच्या विरोधातील कायदा अधिक कठोर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार सोमवारी संसदेत विधेयक सादर करणार आहे. दोन वर्षांपूर्वी अंमलात आलेल्या कायद्यात सुधारणा करत अनेक कडक तरतुदी प्रस्तावित विधेयकात करण्यात आल्या आहेत. कॉक्रोच जनता पक्षाने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायद्यात बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.

सावंत म्हणाले...

‘नीट’ पेपरफुटीबाबत राज्‍यातील विद्यार्थ्यांनी छेडलेल्‍या आंदोलनाला माझा विरोध नाही; परंतु अशा आंदोलनांचा फायदा घेऊन देशद्रोह्यांना मुक्त करण्‍याची मागणी करणाऱ्यांना सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी दिला.

नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली कृती दल परीक्षांमधील सुधारणांविषयी सूचना करणार आहे. त्यावरून परीक्षा पद्धती अधिक सक्षम करण्यासाठी सरकार पावले उचलेल. ‘एनटीए’च्या परीक्षा व्यवस्थेत तंत्रज्ञानाच्या वापराने सुधारणा करण्यासाठी, तसेच परीक्षा पद्धतीत संरचनात्मक बदल घडवून आणण्यास मदत होईल.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT