NEET Paper Leak: पेपरफुटीविरोधात अधिक कठोर पावले उचलली जातील; पंतप्रधानांची व्हिडिओद्वारे स्पष्ट केले, सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे

PM Narendra Modi Video Message: नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता. २३) रात्री उशिरा विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला.
PM Narendra Modi Video Message
NEET Paper LeakDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता. २३) रात्री उशिरा विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला. शुक्रवारी (ता. २४) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपरफुटीविरोधात अधिक कठोर पावले उचलली जातील, असे पंतप्रधानांनी यात स्पष्ट केले.

त्यानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले. मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी वांगचुक यांची रुग्णालयात भेट घेतली. तत्पूर्वी मोदी म्हणाले, की पेपरफुटी हा कोणताही सामान्य विषय नसून, विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत वेदनादायी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘पेपरफुटीचा विषय गंभीर आहे, याची मला जाणीव आहे. लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी हे अत्यंत त्रासदायक आहे.

PM Narendra Modi Video Message
NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

त्यामुळेच पेपरफुटीच्या घटनेनंतर गेल्या अडीच महिन्यांत अनेक मोठी पावले उचलण्यात आली आहेत. गुन्हेगारांना पकडले असून, ते सध्या तुरुंगात आहेत. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, ही आमची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी होती. तत्काळ परीक्षा घेणे अत्यंत आवश्यक होते. सरकारने आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून कमीत कमी वेळेत २२ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा होईल, याचे नियोजन केले.

पाच दिवसांपूर्वी १९ तारखेला निकालही जाहीर झाला आहे. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, मी आज फास्ट ट्रॅक कोर्टासाठी विभागांना निर्देश दिले होते. विभागांनी सातत्याने मेहनत करून रात्री उशिरा मला त्याचा मसुदाही सोपवला आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या मसुद्यावर उद्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या सूचनेनंतर त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com