मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधी लाट उसळली होती. देशाचे सैन्य पाकिस्तानवर हल्ला करण्याची तयारी करीत असताना परदेशी दबावामुळे काँग्रेसने हल्ल्यापासून लष्कराला रोखले.
दहशतवादापुढे हे कृत्य काँग्रेसचा दुबळेपणा सिद्ध करणारे आहे,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण आज (ता.८) मोदींच्या हस्ते उलवे येथे झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
मुंबई मेट्रो लाइनचेही लोकार्पण
मोदींनी विमानतळाच्या उद्घाटनासोबतच मुंबई मेट्रो लाइन -३ चे लोकार्पणही केले. तसेच ‘एमएमआरडीए’तर्फे तयार करण्यात आलेल्या ‘मुंबई वन’ ॲपचेही उद्घाटन करण्यात आले. मंचावर राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय विमानवाहतूक मंत्री राममोहन नायडू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषणे झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.