पणजी : कारवार ते गोवा असा सागरी प्रवास ‘विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेवरून करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच ‘सील्स’ या घातक नौदल कमांडोंसह दिवाळी साजरी केली. या सणाच्या पूर्वसंध्येला जवान आणि त्यांच्या आप्तांसमवेत त्यांनी नौकेवर भोजनही केले.
व्यात आगमन झाले आणि नंतर ते हेलिकॉप्टरने कारवारलगत असलेल्या ‘विक्रांत’ नौकेवर रविवारी सायंकाळी दाखल झाले. तेथे जवानांशी त्यांनी व्यक्तिगत पातळीवर संवाद साधला. भोजनानंतर त्यांना ‘मिग : २९के’ विमानांच्या चित्तथरारक कवायती दाखवण्यात आल्या.
रात्रीच्या वेळी केला गेलेला युद्धसराव त्यांनी खोल समुद्रात पाहिला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात मोदींच्या उपस्थितीत भारतीय नौदलातील अधिकारी आणि जवानांनी देशभक्तिपर गीते सादर केली, ज्यात ‘ऑपरेशन सिंदूर’मधील भारतीय सैन्यदलाच्या यशावर त्यांनी खास लिहिलेले गाणे समाविष्ट होते.
पंतप्रधान काही तासांच्या विश्रांतीनंतर पहाटेच्या योगाभ्यासात जवानांसोबत सहभागी झाले. यावेळी त्यांनी जवानांसारखाच गणवेश परिधान केला होता. दिवाळीनिमित्त त्यांनी मिठाईचे वाटप जवानांना केले आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंतर इतर युद्धनौका या विमानवाहू नौकेजवळून गेल्या. त्यावरील जवानांनीसुद्धा पंतप्रधानांनी सलामी दिली.
या स्टीमपास्ट समारंभात सहभागी झालेल्या युद्धनौकांमध्ये आयएनएस विक्रमादित्य, आयएनएस सुरत, आयएनएस मुरगाव, आयएनएस चेन्नई, आयएनएस इंफाळ, आयएनएस कोलकाता, आयएनएस तुशील, आयएनएस तबर, आयएनएस तेग, आयएनएस बेटवा, आयएनएस दीपक आणि आयएनएस आदित्य या युद्धनौकांचा समावेश होता.
अन् काही क्षणांतच पाकिस्तानने टेकवले गुडघे
यावेळी पंतप्रधानांनी जवानांना उद्देशून केलेल्या संदेशात नमूद केले की, तिन्ही सशस्त्र दलांमधील असामान्य समन्वय तसेच नौदलाने निर्माण केलेली भीती, हवाई दलाचे असाधारण कौशल्य व लष्कराच्या शौर्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानला काही क्षणांतच गुडघे टेकावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने नौदलाने नवीन ध्वज स्वीकारला.
आम्ही नक्षलवाद मोडून काढला
२०१४ पूर्वी देशभरातील सुमारे १२५ जिल्हे नक्षली हिंसाचाराने ग्रस्त होते. गेल्या दहा वर्षांच्या कठोर परिश्रमामुळे ही संख्या आज फक्त ११ एवढी खाली आली आहे. त्या ११ पैकीही फक्त तीन जिल्हेच नक्षलवादाने जास्त पीडित आहेत. नक्षलवाद्यांच्या दहशतीपासून मुक्त झालेले १०० जिल्हे यावर्षी प्रथम भव्य दिवाळी साजरी करत मोकळा श्वास घेत आहेत, असे मोदी यांनी सांगितले.
यंदाची माझी दिवाळी विशेष
‘आयएनएस विक्रांत’वर घालवलेली रात्र शब्दांत सांगणे कठीण आहे. तुम्ही सर्वजण किती प्रचंड ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले आहात, ते मी पाहिले. जेव्हा मी तुम्हाला देशभक्तिपर गीते गाताना पाहिले आणि तुम्ही तुमच्या गाण्यांमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’चे वर्णन केले, तेव्हा युद्धभूमीवर उभे राहून जवानाला कसा अनुभव येतो हे शब्दांत पूर्णपणे व्यक्त करता येत नाही.
माझी दिवाळी तुमच्यासमवेत झाल्याने ती खास असेल. मी तुमच्या प्रत्येकाकडून काही तरी शिकलो आहे. तुमची तपस्या, भक्ती, समर्पण इतके उच्च आहे की मी ते जगू शकलो नाही, परंतु मला ते नक्कीच कळले, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.