PM Narendra Modi On INDIA Dainik Gomantak
देश

PM Narendra Modi यांच्याकडून विरोधी पक्षांच्या आघाडीला "ईस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिदीन"ची उपमा

PM Modi: पंतप्रधानांनी विरोधकांचे वर्णन "पराभूत, हताश, मोदी विरोधासाठी एकासूत्री अजेंडा " असे केले.

Ashutosh Masgaunde

PM Modi on INDIA: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधी पक्षांना "दिशाहीन" म्हणून फटकारले. तसेच त्यांना "इंडियन मुजाहिदीन", "इस्ट इंडिया कंपनी" आणि "पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया"ची उपमा दिली. तसेत विरोधकांच्या "इंडिया" या आघाडीच्या नावाची खल्ली उडवली.

भाजप संसदीय पक्षाच्या साप्ताहिक बैठकीत “मी इतका दिशाहीन विरोध कधीच पाहिला नाही,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

'देशाच्या नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल केली जाऊ शकत नाही'

पंतप्रधान म्हणाले की विरोधी पक्ष हताश आणि निराश आहे आणि त्यांच्या वागण्यावरून असे दिसून येते की त्यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

ईस्ट इंडिया कंपनी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांसारख्या नावांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, केवळ देशाच्या नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल केली जाऊ शकत नाही.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले की, 'विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीचे 'इंडिया' हे नाव लोकांची दिशाभूल करण्यासाठी ठेवले आहे.

विरोधकांना सत्तेत यायचे नाही. 'इंडिया' हे नाव केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी वापरले जात आहे. ईस्ट इंडिया कंपनीतही 'इंडिया' हे नाव आहे. त्यांचा विरोध दिशाहीन आहे. त्यांना दीर्घकाळ विरोधी पक्षातच राहायचे आहे, असा निर्धार विरोधकांनी केल्याचे दिसते.

देशाला आपल्याकडून खूप आशा...

पंतप्रधान म्हणाले की, आज जगामध्ये भारताची प्रतिमा खूप सुधारली आहे आणि आम्ही या दिशेने काम करण्यासाठी समर्पित आहोत.

अमृत ​​काळ संपेपर्यंत म्हणजेच 2047 पर्यंत आपण देशाला विकसित देश बनवू, असे पंतप्रधान म्हणाले. देशवासीयांना आमच्याकडून खूप आशा आहेत आणि विरोधकांना माहित आहे की ते सत्तेत येणार नाहीत. आगामी काळात विरोधक मोडीत निघतील, असे पंतप्रधान म्हणाले.

जनतेच्या पाठिंब्याने भाजप २०२४ च्या निवडणुकीतही सत्तेवर येईल, असा विश्वास असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पुढील काळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. सभागृहात विरोधकांच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी रणनीती आखण्यासाठी भाजपने संसदीय पक्षाची बैठक बोलावली होती.

या सभेतच पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

'...आणि सत्य काही वेगळेच'

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भाजप खासदार रविशंकर प्रसाद म्हणाले की, आम्हाला आमच्या पंतप्रधानांचा अभिमान आहे. 2024 मध्ये आम्ही पुन्हा सत्तेत येत आहोत.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना परदेशी नागरिकांनी केली होती, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

आज लोक इंडियन मुजाहिदीन आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अशी नावे वापरतात पण हे चेहरे एक गोष्ट दाखवतात आणि सत्य काही वेगळेच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar Passed Away: "महाराष्ट्रानं कर्तबगार नेतृत्व गमावलं!" अजित पवारांच्या निधनावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह दामू नाईक, युरींनी वाहिली श्रद्धांजली

Goa Farming: शेती क्षेत्रातून महत्वाची माहिती! गोव्यात खरीप हंगामातील भाजीपाला लागवड घटली; आकडेवारी उघड

Goa Opinion: पदोन्नतीचा पूर आणि कार्यक्षमतेचा दुष्काळ?

Goa Mining: '..अन्यथा खाणपट्टा बोलीला फटका'! निर्यातदार संघटनेचा इशारा; लोहखनिज निर्यातीवर शुल्क जाचक असल्याचा दावा

Ajit Pawar Plane Crash: आग, धूर अन् विमानाचे तुकडे...! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचे व्हिडिओ, फोटो समोर

SCROLL FOR NEXT