PM Narendra Modi  Dainik Gomantak
देश

Gujarat Election 2022: यंदाच्या निवडणुकीत सर्व विक्रम मोडून टाका! पंतप्रधान मोदींचे आवाहन

निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुजरातमध्ये पहिली सभा; माझी एबीसीडी ए फॉर आदिवासीने सुरू होते

गोमन्तक डिजिटल टीम

Gujarat Election 2022: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयाचे सर्व विक्रम मोडून टाका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वलसाड येथील सभेत केले. गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदींची रविवारी गुजरातमध्ये सभा झाली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझ्या एबीसीडीची सुरवात ए फॉर आदीवासी अशी सुरू होते. मी आदिवासी बांधवांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. यावेळी तुम्ही सर्वांनी निवडणुकीतील विजयाचे सर्व विक्रम मोडून दाखवावेत. मला खात्री आहे, गुजरातची जनता भाजपला निवडून देईल.

दोन दशकांपुर्वी गुजरात मागास होता. राज्यात अनेक ठिकाणी वीज, पाणी पोहचले नव्हते. भयानक भुकंपही आला. पण गुजराती लोकांना धीर सोडला नाही. आणि मेहनतीच्या जोरावर गुजरातला जगात टॉपवर आणले. गुजरातच्या विकासात आदिवासी बांधवांचे योगदान आहे. गावाच्या विकासासाठी सर्वाधिक काम आदिवासींनीच केले आहे. येथील मुली पुर्वी शाळेला जाता येत नव्हते, त्या आता डॉक्टर, इंजिनियर बनल्या आहेत. दरम्यान, मोदींच्या सुरत आणि कपराडा येथेही सभा होणार आहेत. याशिवाय भावनगर येथे सामुहिक विवाह सोहळ्यात मोदी सहभागी होणार आहेत.

दरम्यान, काँग्रेसने यापुर्वीच 43 जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. तर भाजपची पहिली उमेदवारी 13 नोव्हेंबर तर दुसरी उमेदवारी यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, भाजपने 182 पैकी160 हून अधिक जागा जिंकण्याचे ठरवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT