पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित केलं. 'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचे हे पहिलेच भाषण आहे. भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी कारवाया तत्काळ थांबवण्याचा करार झाल्यानंतर दोन दिवसांनी पंतप्रधान मोदींनी भारतीयांना संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी भारताच्या शूर सैनिकांचे आणि सुरक्षा यंत्रणांचे विशेष कौतुक केले.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर ७ मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी छावण्यांवर हवाई कारवाई केली. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानकडून प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेला हल्ला भारतीय सशस्त्र दलांनी यशस्वीरित्या परतवून लावला.
देशाच्या सुरक्षेसाठी नुकतेच पार पडलेले 'ऑपरेशन सिंदूर' हे भारतीय संरक्षण यंत्रणांसाठी एक अभूतपूर्व यश ठरले आहे. या ऑपरेशनमधून भारताने केवळ आपली लष्करी ताकदच नव्हे तर धोरणात्मक संयमही जगासमोर सादर केला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना उद्देशून भावनिक भाषण करत आपल्या शूर सैनिकांचे आणि सुरक्षा यंत्रणांचे विशेष कौतुक केले.
“आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाची ताकद आणि संयम पाहिला आहे,” असे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्वप्रथम, मी प्रत्येक भारतीयाच्या वतीने भारताच्या बलाढ्य सैन्याला, आपल्या गुप्तचर संस्थांना आणि आपल्या शास्त्रज्ञांना सलाम करतो.
आज, प्रत्येक दहशतवाद्याला, दहशतवाद्यांच्या प्रत्येक संघटनेला आमच्या बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचे परिणाम कळले आहेत. ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक नाव नाही. ते देशातील कोट्यवधी लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. आपल्या शूर सैनिकांच्या शौर्याला मी सलाम करतो. हे केवळ एक सैनिकी मिशन नव्हते, तर भारताच्या सुरक्षिततेच्या दिशेने केलेले निर्णायक पाऊल होते, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारत एवढे मोठे पाऊल उचलेल, अशी दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. जेव्हा भारतीय क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने पाकिस्तानमधील त्या तळांवर हल्ला केला तेव्हा दहशतवाद्यांचे तळचं उद्ध्वस्त झाल्या नाहीत तर त्यांचे धाडसही चिरडले गेले.
ऑपरेशन सिंदूरसध्या फक्त स्थगित करण्यात आलंय. पाकिस्तान कसा वागतो हे पाहणार आहोत, असा सूचक इशाराच मोदींनी यावेळी बोलताना दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.