Vande Bharat Dainik Gomantak
देश

Vande Bharat: मुंबई-गांधीनगर दरम्यान धावणार 'वंदे भारत एक्सप्रेस', PM मोदी...

Third Vande Bharat Train: गुजरातमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Third Vande Bharat Train: गुजरातमध्ये नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला वंदे भारत ट्रेनच्या रुपाने नवीन कनेक्टिव्हिटीची भेट देत असल्याचे मानले जात आहे. सध्या देशात 2 वंदे भारत ट्रेन धावतात, एक दिल्ली ते बनारस दरम्यान, दुसरी दिल्ली ते कटरा आणि आता गांधीनगर ते मुंबई दरम्यान, ही तिसरी वंदे भारत ट्रेन असेल, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर येथून सुरु करतील.

दरम्यान, गुजरातमधील (Gujarat) विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या जनतेला आणखी एक भेट देणार आहेत. वंदे भारत ट्रेन, सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज आहे. देशातील या सर्वात अत्याधुनिक ट्रेनला, शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान मोदींच्या हस्ते ग्रीन सिग्नल दाखवण्यात येणार आहे.

दुसरीकडे, भारतीय रेल्वेचे (Indian Railways) चित्र हळूहळू बदलत आहे, सर्व सुविधांनी युक्त वंदे भारत गाड्यांची संख्या आता वाढत आहे. विशेष म्हणजे, ही ट्रेन बुलेट ट्रेनपेक्षा वेगवान आहे. 0 ते 100 पर्यंत, ही ट्रेन फक्त 52 सेकंदात वेग पकडते. वंदे भारत ट्रेनने ताशी 180 किमी वेगाने चाचणी पार केली आहे.

तसेच, पीएम मोदी वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणार आहेत. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगर ते अहमदाबाद असा प्रवास करतील. देशातील तिसरी वंदे भारत ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन गांधीनगर ते मुंबई (Mumbai) दरम्यान धावणार असून तिचा प्रवास 5 तासात पूर्ण होणार आहे. उद्घाटनानंतर 30 सप्टेंबरपासून लोक या ट्रेनमधून प्रवास करु शकतील.

शिवाय, वंदे भारत ट्रेन सेल्फ प्रोपेल्ड सिस्टीमवर काम करते, ही सिस्टीम जवळपास प्रत्येक डब्याखाली बसवली जाते. नवीन वंदे भारतला 6000 hp चा स्पीड मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT