गुजरात विधानसभेचा (Gujrat Elections) सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. भाजपचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुजरातमध्ये होते. मोदींनी अहमदाबादमध्ये सुमारे 54 किलोमीटरचा रोड शो केला. यावेळी मागून एक रुग्णवाहिका आली. पंतप्रधान मोदींनी मागून येणाऱ्या एका रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी आपला ताफा थांबवला. याचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरोडा गावातून 'रोड शो'ला सुरुवात केली. 'रोड शो'साठी लोकांनी अफाट गर्दी केली होती. अहमदाबाद येथून गांधीनरला जात असताना, मोठ्या संख्येने लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा फुलांचा वर्षाव करत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधानांनी देखील गर्दीला अभिवादन केले. दरम्यान, यावेळी पाठीमागून आलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी मोदींनी आपला ताफा थांबवला. पंतप्रधानांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ सक्रिय होऊन ताफ्याला थांबवून रुग्णवाहिकेला रस्ता दिला.
दरम्यान, यापूर्वी देखील नरेंद्र मोदी यांनी रुग्णवाहिकेसाठी रस्ता दिला होता. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी देखील असेच घडले होते.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. पंतप्रधान मोदी 5 डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 16 विधानसभा मतदारसंघांमध्ये रोड शो करणार आहेत. हा रोड शो निकोल, ठक्करबापानगर, बापूनगर, अमराईवाडी, मणिनगर, दाणीलिंबडा, जमालपूर खाडिया, एलिसब्रिज, वेजलपूर, घाटलोडिया, नारणपूर आणि साबरमती या विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे.
मागील 27 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र 2001 ते 2014 याकाळात गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपला 182 पैकी 99 जा जिंकल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.