Kargil Vijay Diwas PTI
देश

'दहशतवादाचे मास्टर्स माझा आवाज थेट ऐकू शकतात', PM मोदींचा पाकिस्तानला इशारा

Kargil Vijay Diwas: पंतप्रधानांनी द्रास युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करत देशाच्या सेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सशस्त्र दलातील अधिकारी आणि सैनिकांना श्रद्धांजली वाहली

गोमन्तक डिजिटल टीम

कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला 25 वर्षे पूर्ण होतायेत. विजयाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कारगिल युद्धातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.

पंतप्रधानांनी द्रास युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करत देशाच्या सेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सशस्त्र दलातील अधिकारी आणि सैनिकांना श्रद्धांजली वाहली. 26 जुलै 1999 रोजी लडाखमधील कारगिलच्या बर्फाळ प्रदेशात झालेल्या लढाईत भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

तीन महिने चाललेल्या लढाईला भारताने "ऑपरेशन विजय" राबवले होते. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा दीन 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो.

"आज, लडाखची ही महान भूमी कारगिल विजय दिवसाच्या 25 व्या वर्धापन दिनाची साक्ष देत आहे. कारगिल विजय दिवस आपल्याला सांगतो की देशासाठी केलेले बलिदान अमर आहे..."

"मला दहशतवाद्यांना सांगायचे आहे की त्यांचे दुष्ट मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत. शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. लडाख किंवा जम्मू-काश्मीरच्या विकासाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला भारत पराभूत करेल," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मी बोलतोय तिथून दहशतवादाचे मास्टर्स माझा आवाज थेट ऐकू शकतात, मला या दहशतवादाच्या समर्थकांना सांगायचे आहे की त्यांचे नापाक इरादे कधीच सफल होणार नाहीत. आमचे जवान दहशतवादाला पूर्ण ताकदीने चिरडून टाकतील आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशा शब्दात मोदींनी दहशतवाद्यांना ठणकावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT