Prime Minister Narendra Modi  Twitter/ @ANI
देश

HP Election: हिमाचल प्रदेशची निवडणूक खास, येत्या 25 वर्षांचा रोडमॅप ठरणार -PM मोदी

Himachal Pradesh Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) हिमाचल प्रदेशातील सुंदर नगरमध्ये 'विजय संकल्प रॅली'ला संबोधित केले.

दैनिक गोमन्तक

Himachal Pradesh Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) हिमाचल प्रदेशातील सुंदर नगरमध्ये 'विजय संकल्प रॅली'ला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'हिमाचलची निवडणूक खूप खास आहे. यावेळी 12 नोव्हेंबरला होणारे प्रत्येकी एक मत हिमाचलचा पुढील 25 वर्षांचा रोडमॅप ठरवेल. अमृतकालच्या या वर्षांत हिमाचलमध्ये जलद विकास आवश्यक आहे, स्थिर सरकार आवश्यक आहे. मला आनंद आहे की हिमाचलचे लोक, येथील तरुण, येथील माता-भगिनी हे चांगल्या प्रकारे समजून घेत आहेत.'

काँग्रेस हे मागोवाच्या धोरणावर आहे

पीएम मोदी पुढे म्हणाले की, 'हिमाचलमधील जनता भाजप सरकारचे जोरदार पुनरागमन करण्यासाठी कटिबद्ध आहे. ही सैनिकांची भूमी, ही शूर मातांची भूमी, जेव्हा संकल्प घेते तेव्हा ते सिद्ध करुन दाखवते. काँग्रेससाठी (Congress) सरकारमध्ये येणे म्हणजे शाही धडाडी चालवल्यासारखे झाले आहे. हिमाचलमध्ये, अनेक दशकांपासून लालसा, खोटी आश्वासने देणे, खोटी हमी देणे ही काँग्रेसची जुनी खोड राहीली आहे. शेतकर्‍यांना (Farmers) कर्जमाफीच्या नावाखाली काँग्रेस कसे खोटे बोलत आहे, याचा सारा देश साक्षीदार आहे.'

वन रँक वन पेन्शनवर पंतप्रधानांनी हे सांगितले

पीएम मोदी पुढे असेही म्हणाले की, 'काँग्रेसचे सत्य हे आहे की, त्यांनी 2012 मध्ये ज्या जाहीरनाम्याच्या आधारे निवडणूक जिंकली, त्यात त्यांनी अनेक मोठ-मोठी आश्वासने दिली, मात्र एकही पाळले नाही. तर भाजपची (BJP) ओळख अशी आहे की, आम्ही जे बोलतो ते पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र काम करतो. काँग्रेस 40 वर्षांपासून देशातील सैनिकांना वन रँक वन पेन्शनचे आश्वासन देत आहे. मात्र इतकी वर्षे केंद्रात काँग्रेसचे सरकार असूनही त्यांनी काहीही केले नाही.'

पंतप्रधान मोदी शेवटी म्हणाले की, 'स्वातंत्र्यानंतर देशाचा पहिला घोटाळा काँग्रेसने संरक्षण क्षेत्रातच केला. तेव्हापासून काँग्रेसचे सरकार टिकेपर्यंत संरक्षण सौद्यांमध्ये खूप दलाली खाल्ली. संरक्षण उपकरणांच्या बाबतीत देशाने स्वावलंबी व्हावे असे काँग्रेसला कधीच वाटत नव्हते.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kasule: तळ्याच्या रक्षणासाठी केली श्रीगणरायाची स्थापना, पेडण्याच्या राजाचा Video Viral

Adivasi Bhavan: आदिवासी भवनाची प्रक्रिया ‘जीएसआयडीसी’कडून सुरू! 60 कोटींचा प्रकल्‍प होणार 2 वर्षांत

FDA Raid: कळंगुट-बागा येथे 'सर्जिकल स्ट्राईक! निकृष्ट काजू विकणाऱ्यांवर चाप; एका रात्रीत 8 दुकाने, 3 रेस्टॉरंट बंद

Goa Rain: पाऊस थांबला, उकाडा वाढला! दमट हवामानाने नागरिक त्रस्त; तुरळक सरी कोसळण्याची शक्यता

Goa News: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त गोव्यात ‘सेवा पंधरवडा’! लोकसहभागातून राबवले जाणार उपक्रम

SCROLL FOR NEXT