PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

PM Narendra Modi: आधी भावाचा अपघात, आता आई आजारी; दोन दिवसात PM मोदींवर दोन मोठी संकटे

Prime Minister Narendra Modi: गेल्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरात दोन मोठ्या घटना घडल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Prime Minister Narendra Modi: गेल्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरात दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. प्रथम, त्यांचे बंधू प्रल्हाद मोदी कर्नाटकातील म्हैसूर येथे एका रस्ते अपघाताचा बळी ठरले. त्याचवेळी बुधवारी त्यांची आई हीराबेन यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले.

म्हैसूरमध्ये प्रल्हाद मोदींची प्रकृती सुधारली आहे

कर्नाटकातील (Karnataka) म्हैसूरमध्ये मंगळवारी प्रल्हाद मोदींचा अपघात झाला. त्यांच्यासोबत मुलगा आणि सूनही होती. तिघेही गंभीर जखमी झाले. तथापि, रुग्णालयाने जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार, सर्व लोक धोक्याबाहेर असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. तिघांवरही उपचार सुरु असून त्यांना आज सायंकाळ किंवा गुरुवारी सकाळी डिस्चार्ज मिळू शकेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, आधी डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीची तपासणी करणार आहे.

आईची प्रकृती खालावली, रुग्णालयाने सांगितले- प्रकृती स्थिर आहे

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती बुधवारी खालावली, त्यानंतर त्यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिराबेन यांचे वय 100 वर्षांहून अधिक आहे. विशेष म्हणजे, त्या अजूनही खूप सक्रिय आहेत. या वर्षी जून महिन्यात त्यांनी 100 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले होते.

दुसरीकडे, यूएन मेहता रुग्णालय व्यवस्थापनाने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांना अहमदाबादमधील यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

SCROLL FOR NEXT