पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाच्या 98 व्या भागासाठी संबोधित केले. लोकसहभागाच्या अभिव्यक्तीसाठी तुम्ही सर्वांनी 'मन की बात' हे एक अप्रतिम व्यासपीठ बनवले आहे. असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आम्ही 'मन की बात'मध्ये 3 स्पर्धांबद्दल बोललो होतो. या स्पर्धा देशभक्तीवर आधारित गाणी, लोरी आणि रांगोळी स्पर्धा यावर आधारित होत्या. मला हे सांगायला आनंद होत आहे की देशभरातील 700 हून अधिक जिल्ह्यांतील 5 लाखांहून अधिक लोक यात सहभागी झाले होते. अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी ख्रिसमसमधील बुकिंगची आकडेवारी देखील सांगितली. "काही दिवसांपूर्वी मी वाचले होते की ख्रिसमसमध्ये लोक गोव्याला जातात आणि त्याकाळात गोवा पूर्णपणे बुक केलेला असतो. पण यावेळी गोव्यापेक्षा काशीमध्ये जास्त बुकिंग झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. काशीचा खासदार झाल्याचा मला खूप आनंद आहे." असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
रांगोळी स्पर्धेबद्दल माहिती देताना पंतप्रधान मोदी गोव्यातील रांगोळी कलाकार गुरूदत्त वांटेकर याचे कौतुक केले. गुरूदत्त यांनी स्पर्धेत महात्मा गांधी यांची रांगोळी काढली होती. या स्पर्धेत त्यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे.
मोदींनी यावेळी नाटू नाटू या गाण्याबद्दल देखील उल्लेख केला. भारतातील कोरियन दूतावासाने या गाण्यावर नृत्य केले आहे. "भारतातील कोरियन दूतावासाने आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू वरील नृत्याविष्कार सामायिक केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला अत्यंत प्रफुल्लित आणि मोहक असा सांघिक प्रयत्न म्हटले असून त्याची प्रशंसा केली आहे. भारतातील कोरियन दूतावासाने केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी “अत्यंत प्रफुल्लित आणि मोहक सांघिक प्रयत्न." असे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.