PM Modi  Dainik Gomantak
देश

PM मोदींच्या लोकसभा मतदारसंघ काशीमध्ये बांधण्यात आले सर्वात मोठं स्वयंपाकघर

उत्तर भारतातील सर्वात मोठे मेगा किचन अक्षय पात्र बनारसच्या एलटी कॉलेजमध्ये तयार करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या लोकसभा मतदारसंघात लहान मुलांना पौष्टिक आहाराची मोठी भेट मिळणार आहे. उत्तर भारतातील (North India) सर्वात मोठे मेगा किचन अक्षय पत्र बनारसच्या एलटी कॉलेजमध्ये तयार करण्यात आले आहे. सध्या इथून तयार केलेला पौष्टिक आहार वाराणसीतील (Varnasi) 148 शाळकरी मुलांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दिला जाणार आहे. (pm modi kashi varanasi akshay patra mid day meal largest kitchen built food one lakh children in 3 hours)

तीन एकरांमध्ये पसरलेले उत्तर भारतातील सर्वात स्वयंपाकघर
तीन एकरांमध्ये पसरलेले हे उत्तर भारतातील (India) सर्वात मोठे स्वयंपाकघर (Kitchen) असेल. येथे एका तासात एक लाख चपात्या तयार होतील. यासोबतच दोन तासांत 1100 लिटर डाळी, 40 मिनिटांत 135 किलो तांदूळ आणि दोन तासांत 1100 लिटर भाजी तयार होणार आहे.

ऑटोमॅटिक किचनमध्ये तयार होणार मुलांसाठी अन्न
एवढ्या मोठ्या संख्येने मुलांसाठी जेवण तयार करण्यासाठी संपूर्ण स्वयंचलित स्वयंपाकघर बांधण्यात आले आहे. खास तयार केलेली मशीन ज्यामध्ये कणिक मळण्यापासून चपात्या बनवण्यापर्यंतच्या मशिन्सचा समावेश आहे, तर डाळी-भाज्या बनवण्यासाठीही अत्याधुनिक मशीनचा वापर केला जात आहे.

1 लाख मुलांसाठी तयार होणार जेवण, स्वच्छतेची काळजी घेतली जाणार
24 तास या किचनमध्ये 300 लोक काम करतील. हे लोक सुमारे एक लाख मुलांसाठी अन्न बनवतील. संपूर्ण स्वयंपाकघरात स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. उदाहरणार्थ, जर आपण भाताबद्दल बोललो तर ते प्रथम सामान्य पाण्याने, नंतर कोमट पाण्याने आणि नंतर तिसऱ्यांदा सामान्य पाण्याने स्वच्छ केले जाईल. भाजीपाला आणि कडधान्यांसाठीही अशीच स्वच्छता करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

High Court: 'गाय केवळ पूजनीय नाही तर...', गोवंश तस्कराला हायकोर्टाचा झटका; नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण

Rohit Sharma Record: फक्त एक सामना आणि हिटमॅन 'रोहित' रचणार मोठा विक्रम; सामील होणार खास क्लबमध्ये

Ganesh Festival 2025: परंपरा, कला आणि पर्यावरणाचा संगम... सुबक गणेशमूर्ती साकारणारे 'च्यारी घराणे'; दक्षिण गोव्यात प्रसिद्ध

Team India Title Sponsor: टीम इंडियाच्या जर्सीवरून उतरलं 'ड्रीम', आता कोण होणार नवा प्रायोजक? 'या' मोठ्या कंपनीचं नाव चर्चेत

UP Crime: आंतरराज्य सायबर टोळीचा पर्दाफाश! गोव्यातून चालवले जात होते ऑनलाइन बेटिंग, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT