PM Modi France Visit Dainik Gomantak
देश

PM Modi France Visit: पंतप्रधान मोदी फ्रान्सला रवाना; बॅस्टिल डे परेडला राहणार उपस्थित पाहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (13 जुलै) फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

Puja Bonkile

PM Modi France Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (13 जुलै) फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती च्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.  एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दुपारी 4 वाजता पॅरिसला पोहोचतील आणि ऑर्ली विमानतळावर त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत होणार अशी माहिती दिली असून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

फ्रान्समध्ये होणाऱ्या बॅस्टिल डे परेडमध्ये पंतप्रधान मोदींना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या भेटीच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 13 आणि 14 जुलै रोजी फ्रान्सला भेट देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी गुरुवारी संध्याकाळी 7.30 वाजता सिनेटमध्ये पोहोचतील आणि सिनेटचे अध्यक्ष जेरार्ड लार्चर यांची भेट घेतील.

  • PM मोदींचे वेळापत्रक

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दुपारी ४ वाजता पॅरिसला पोहोचणार आहेत. संध्याकाळी सिनेट अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर ते नऊच्या सुमारास फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

PM मोदी रात्री 11 वाजता ला सीन म्युझिकेल येथे भारतीय समुदायाला संबोधित करतील. यानंतर पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहण्यासाठी एलिसी पॅलेसमध्ये पोहोचतील.

  • फ्रान्सनंतर पंतप्रधान मोदी यूएईला जाणार

फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा संपवून परत आलेले पंतप्रधान मोदी 15 जुलै रोजी अबुधाबीला भेट देतील. जिथे ते संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करतील. ऊर्जा, अन्न सुरक्षा, संरक्षण या मुद्द्यांवर द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यासाठी चर्चा करणार आहेत.

  • भारत-फ्रान्स मैत्रिची 25 वर्षे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीमुळे भारत आणि फ्रान्स यांच्यातील आर्थिक सहकार्याला चालना मिळण्याची शक्यता आहे आणि युरोपियन युनियन आणि भारत यांच्यातील धोरणात्मक संबंधांना अधिक आकार मिळण्याची शक्यता आहे.

मोदी यांच्या फ्रान्स भेटीला विशेष महत्त्व आहे कारण दोन्ही राष्ट्रे त्यांच्या धोरणात्मक भागीदारीची 25 वर्षे साजरी करत आहेत.

  • माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनाही मिळाला होता सन्मान

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी बॅस्टिल डे परेडला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी फ्रान्सला जाणार आहेत. 2009 मध्ये मनमोहन सिंग यांच्यानंतर बॅस्टिल डे परेडमध्ये सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT