PM modi  Dainik Gomantak
देश

बजरंग दलावर बंदी घालण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनावर पंतप्रधान मोदींची टीका; काय म्हणाले वाचा सविस्तर...

आधी श्रीरामाला कुलूप लावले, आता बजरंगबलीचा नंबर

Akshay Nirmale

PM Narendra Modi On Congress: कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मंगळवारी काँग्रेसने त्यांचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात काँग्रेसने बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनेवर बंदी घालण्याचेही आश्वासन दिले आहे. त्यावर मंगळवारी संध्याकाळी बंगळूर येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

(PM Narendra Modi on Congress Menifesto for Karntaka Election 2023)

एकेकाळी काँग्रसेने प्रभु श्रीरामाला कुलूपबंद केले होते, आता बजरंगबलीला कुलुपबंद करत आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे. मंगळवारी दिवसभरात पंतप्रधान मोदींनी चित्रदुर्ग, विजयनगर आणि सिंधनूर येथे सभा घेतेल्या.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही तीच काँग्रेस आहे ज्या काँग्रेसने आधी श्रीरामाला कुलूप लावले होते. आता बजरंगबलीला बंद करण्याची भाषा करत आहेत. यातून पंतप्रधानांनी अयोध्येतील राम लल्ला मंदिराला काँग्रेसने कुलूप लावले होते, हे सूचित केले आहे. तेव्हा काँग्रेस सरकार सत्तेत होते.

पीएम मोदी विजय नगर येथील सभेत म्हणाले की, आज हनुमानजींच्या या पवित्र भूमीवर नतमस्तक होण्यासाठी आलो असतानाच मला काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यातून बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा केल्याचे कळले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT