पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी  Dainik Gomantak
देश

Mann ki Baat: 83 व्या आवृत्तीवेळी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधले

Rohit Hegade

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मासिक रेडिओ (Radio) कार्यक्रमात 'मन की बात' च्या 83 व्या आवृत्तीमध्ये देशाला संबोधित केले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, डिसेंबरमध्ये देशात नौदल दिन (Naval Day) आणि सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यात येणार आहे. शिवाय 16 डिसेंबर हे 1971 च्या युद्धाचे स्मरणीय जयंती वर्ष देखील याच महिन्यात आहे.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, मला तुमच्या सर्वांकडून Namo App आणि MyGov वर विविध मार्गदर्शन सूचना मिळाले आहेत. आपण आपल्याच कुटुंबाचा एक भाग समजून तुम्ही तुमच्या आयुष्यातील सुख-दु:ख आमच्यासोबत शेअर केले. या सूचना मला देत असताना यामध्ये अनेक तरुण आणि विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे. याबद्दल खरोखरच कौतुक आहे. देशातील 'मन की बात'चा परिवाराचा विस्तार होत आहे. तो मनाशी जोडत आहे आणि उद्देशानेही जोडत आहे आणि हे नाते आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण करते.

अमृत महोत्सव

अमृत महोत्सव हा देशासाठी काहीतरी करण्यासाठी प्रेरणा देत असतो. देशातील जनता असो वा सरकार असो, तेच पंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वच ठिकाणी अमृत महोत्सव साजरा केला जातो. तसेच या उत्सवाशी संबंधित कार्यक्रम सतत सुरू असतात. आदिवासी समुदायाचे स्वातंत्र्यातील मोठे योगदान आहे आणि हे लक्षात घेता देशाने आदिवासी गौरव सप्ताहही साजरा केला आहे. देशाच्या विविध भागात हा कार्यक्रम करण्यात आला. अंदमान आणि निकोबार बेटांवर, जरावा आणि ओंगे सारख्या आदिवासी (Tribal) लोकांनी त्यांच्या संस्कृतीचे (culture) थेट प्रदर्शन देखील केले.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, पूर्वी दिल्लीतील 'आझादी की कहानी - चिल्ड्रन्स स्पीच' अशा कार्यक्रमात मुलांनी स्वातंत्र्यलढ्याच्या कथांचे सादरीकरण केले. यामध्ये विशेष बाब अशी की भारतासह नेपाळ, मॉरिशस, टांझानिया, न्यूझीलंड आणि फिजी या देशातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा म्हटले होते की, 'ये आसा धरी चित् में, ये आसा धरी चित् में, कहा जाठ माती मोर. वृंदावन सुख रंग कौ, वृंदावन सुख रंग कौ, कहू ना पायौ'.

झाशी आणि बुंदेलखंडचे काय आहे योगदान?

पंतप्रधान म्हणाले, आपल्या देशाच्या लढ्यात झाशी आणि बुंदेलखंडचे यांचे योगदान आपण सर्वांना माहीत आहे. राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई (Rani Lakshmibai, Jhalkaribai) सारख्या नायिकाही त्या वेळी होत्या. तसेच मेजर ध्यानचंद सारखा खेलरत्न याच भागाने देशाला दिला. तसेच निसर्गसुद्धा आपल्या आईप्रमाणे आपल्या मागे आहे आणि त्यातून तो नवनवीन रंग भरत असतो.

निसर्गाला मूळ रूपात आणायचे:

आपल्या देशात अनेक राज्ये आहेत, अनेक क्षेत्त्रात लोकांनी त्यांच्या नैसर्गिक वारशाचे रंग जोपासले आहेत. निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची जीवनशैली या लोकांनी आजही जिवंत ठेवली आहे.

पंतप्रधान पद सत्तेसाठी नसून सेवेसाठी

मोदी पुढे म्हणाले, जालौनमध्ये एक पारंपरिक नदी आहे. जिला नून नदी म्हणून ओळखले जाते. या भागातील शेतकऱ्यांसाठी ती नदी पाण्याचा मुख्य स्त्रोत असायची. परंतु ही नदी हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचली. ही परिस्थिती बदलण्यासाठी जालौनच्या लोकांनी पुढाकार घेतला.

स्टार्टअप्समध्ये भारत आघाडीवर

स्टार्टअप्सबाबत (startups) बोलताना पंतप्रधान म्हणाले, आज स्टार्टअपच्या जगात भारत जगात आघाडीवर आहे. स्टार्टअप्समध्ये वर्षानुवर्षे विक्रमी गुंतवणूक होत आहे. हे क्षेत्र खूप वेगाने प्रगती करत आहे. देशातील प्रत्येक लहान शहरात स्टार्टअप्सचा आवाका वाढला आहे. एका रिपोर्टनुसार या वर्षी अवघ्या 10 महिन्यांत भारतात दर 10 दिवसांनी एक युनिकॉर्न तयार झाली होती.

तरुणांनची समृद्धी:

तरुणांनी समृद्ध असलेल्या देशात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कल्पना आणि नावीन्य, दुसरी म्हणजे जोखीम पत्करण्याची आवड आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणतेही काम पूर्ण करण्याची जिद्द. या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा अभूतपूर्व परिणाम होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT