PM Kisan Dainik Gomantak
देश

PM Kisan 20th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; असा तपासा बॅलन्स

PM Kisan Samman Nidhi: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची योजना आहे. त्याचा पहिला हप्ता २०१९ मध्ये हस्तांतरित करण्यात आला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: केंद्र सरकारने शनिवारी (०२ ऑगस्ट) पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा २० वा हप्ता हस्तांतरित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बनारस येथून हा हप्ता ट्रान्सफर केला. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये पाठवण्यात आले आहेत. सरकारने ९.७ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २०,५०० कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.

आधार कार्डद्वारे तपासा बॅलन्स (How To check PM Kisan balance?)

पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांनी प्रथम पीएम किसान वेबसाइटवर जावे. त्यानंतर तेथे बेनिफिशअरी स्टेटसवर (Beneficiaey Status) क्लिक करा. आता तुमचा आधार क्रमांक आणि खाते क्रमांक विचारात टाका. तुम्ही दोघांपैकी कोणतीही माहिती देऊन पुढे जाऊ शकता. गेट डेटा वर क्लिक करताच, लाभार्थ्यांची यादी दिसेल. तसेच, पेमेंटचे तपशील दिसतील.

पैसे आले नाहीत तर काय करावे?

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांना अधिक काळजी करण्याची गरज नाही. सर्वप्रथम, त्यांनी ई-केवायसी केले आहे की नाही ते तपासावे. जर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर प्रथम ती पूर्ण करावी. पैसे मिळण्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षी मिळतात ६००० रुपये

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची योजना आहे. त्याचा पहिला हप्ता २०१९ मध्ये हस्तांतरित करण्यात आला होता. तेव्हापासून, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षातून २००० रुपयांचे तीन हप्ते हस्तांतरित केले जातात. या शेतकऱ्यांना दरवर्षी सरकारकडून ६००० रुपये मिळतात.

या योजनेचा कोणते शेतकरी हा लाभ घेऊ शकतात?

१- भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

२- शेती असणे आवश्यक आहे.

३- लहान किंवा सीमांत शेतकरी असावा.

४- १०,००० रुपयांपेक्षा जास्त निवृत्ती वेतन मिळत नसावे.

५- आयकर भरत नसणारे शेतकरी

पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी अर्ज कसा करायचा

१- सर्वप्रथम https://pmkisan.gov.in वर जा

२- नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा.

३- तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा लिहा.

४- तपशील भरल्यानंतर, YES वर क्लिक करा.

५- संपूर्ण फॉर्म भरा आणि नंतर सबमिट करा वर क्लिक करा.

कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी, पंतप्रधान किसानच्या हेल्पलाइन क्रमांक १५५२६१ किंवा ०११-२४३३००६०६ वर कॉल करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT