Dog attack on 6 month old baby viral video Dainik Gomantak
देश

Dog Attack Viral Video: 6 महिन्यांच्या बाळावर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला, आत्यानं वाचवला चिमुरडीचा जीव; अंगावर काटा आणणारा थरार व्हायरल!

Pitbull Attack Sonipat Haryana 6 Month Old Baby: भटक्या कुत्र्यांची दहशत देशभरात कायम असतानाच, आता लोकांच्या घरात पाळलेले कुत्रेही अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक बनत चालले आहेत.

Manish Jadhav

Pitbull Attack Sonipat Haryana 6 Month Old Baby: भटक्या कुत्र्यांची दहशत देशभरात कायम असतानाच, आता लोकांच्या घरात पाळलेले कुत्रेही अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक बनत चालले आहेत. गेल्या वर्षभरात पाळीव श्‍वानांनी निष्पाप नागरिकांवर प्राणघातक हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

अशीच एक थरकाप उडवणारी ताजी घटना हरियाणामध्ये सोनीपत जिल्ह्यातील सिक्का कॉलनीत घडली. येथे एका पिटबुल प्रजातीच्या कुत्र्याने 6 महिन्यांच्या चिमुरड्या बाळावर अतिशय भयानक हल्ला केला. ही 6 महिन्यांची मुलगी तिच्या आत्याच्या कडेवर होती आणि त्या दोघी गल्लीतून जात असताना अचानक या कुत्र्याने त्यांच्यावर झेप घेतली.

घडलेल्या या दुर्दैवी घटनेत, कुत्र्याने अचानक हल्ला केल्यामुळे मुलगी आत्याच्या कडेवरुन थेट खाली पडली. त्यानंतर त्या पिटबुलने चिमुरडीला तोंडात पकडून ओढायला सुरुवात केली. आत्याने आपल्या जिवाची पर्वा न करता बाळाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांचा आरडाओरड ऐकून आजूबाजूचे लोक मदतीसाठी घरातून बाहेर धावले.

कुत्र्याने चिमुरडीला जबड्यात पकडून इकडेतिकडे धावण्यास सुरुवात केली. अखेर एका व्यक्तीने हातात काठी आणून कुत्र्याला मारली, ज्यानंतर चिमुरडी कुत्र्याच्या तावडीतून सुटली. मात्र, या भीषण हल्ल्यात 6 महिन्यांचे बाळ आणि तिची आत्या दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या.

हा संपूर्ण थरार गल्लीतील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गंभीर जखमी झालेल्या बालिकेला आणि तिच्या आत्याला तातडीने रोहतक येथील मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे चिमुरडीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

मुलीच्या कुटुंबीयांनी अद्याप पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली नसली तरी, धोकादायक पाळीव कुत्र्यांच्या (Dog) मालकांवर कठोर कारवाई करण्याची आणि नियमांचे पालन करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

याआधीही पंजाबमधील पतियाळा येथे एका बँक मॅनेजर आणि त्यांच्या प्राध्यापक पत्नीवर अशाच प्रकारे पिटबुलने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले होते, तर दिल्लीतही 6 वर्षांच्या मुलाचा कान पिटबुलने चावून तोडला होता. या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पाळीव कुत्र्यांच्या सुरक्षेशी संबंधित नियमांवर आणि मालकांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT