Covid-19 Lockdown
Covid-19 Lockdown Dainik Gomantak
देश

Covid-19 Third Wave: पुन्हा लॉकडाऊनच्या घोषणेचे सत्य कितपत खरे

दैनिक गोमन्तक

कोरोना (Covid-19) संसर्गाच्या दुसर्‍या लाटेला नियंत्रणात आणत असतांनाच तिसऱ्या लाटेच्या चर्चा (Covid19 Third Wave) भारतात सुरू आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल विचार करून लोक घाबरले आहेत. मात्र यावर मात करण्यासाठी देशभर लसीकरण अभियान वेगाने राबविले जात आहे. आणि त्याच वेगाने सोशल मीडियावर कोरोनाबद्दलही अफवा पसरत आहेत. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसंदर्भात आजकाल एक चित्र सोशल मीडियावर फिरत आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या पथकाने या चित्राची तपासणी केली आहे. (PIB Fact Check: Will there be a lockdown again)

सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो एका टीव्ही न्यूज चॅनेलचा स्क्रीनशॉट आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, देशात कोरोनाची (Covid-19) तिसरी लाट सुरू झाली आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. यानंतर 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान कडक लॉकडाउन करण्यात येणार असे लिहिले आहे. पीआयबीने ही बातमी बनावट असल्याचे सांगितले आहे.

पीआयबीने काय म्हटले?

या फोटोसंदर्भात पीआयबीने ट्विट करुन लिहिले आहे की, कोरोनाची तिसरी लाट देशात सुरू झाली असून पुन्हा कडक लॉकडाउन लावण्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. अशा प्रकारची कोणतीही घोषणा पंतप्रधानांनी केलेली नाही. कृपया असे दिशाभूल करणारे संदेश शेअर करू नका आणि कोरोना रोखण्यासाठी कोविड योग्य वर्तन स्वीकारले पाहिजे. पीआयबीने लिहिले की, कोरोनाची तिसऱ्या लाटेसंदर्भात आणि लॉकडाउन लागू करण्याबाबत पंतप्रधान मोदींनी कोणतीही घोषणा केलेली नाही.

देशात कोरोना संक्रमणाची स्थिती

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 45,951 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी रिकवरी रेट वाढून 96.92 झाला आहे. कोरोनाचा नवा प्रकार 'डेल्टा प्लस' आता जगभरात वेगाने पसरत आहे. यामुळे बर्‍याच देशांमध्ये पुन्हा लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे. यापूर्वीही कोरोना संसर्गाबाबत बनावट बातम्या व्हायरल झाल्या आहेत. ज्याबद्दल पीआयबी तपास करत आहे आणि लोकांना रियल फॅक्ट समजावून सांगत अफवांपासून जागृत करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

SCROLL FOR NEXT