Crime News Dainik Gomantak
देश

Delhi Crime: कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; जीवे मारण्याचीही दिली धमकी...

Delhi: दिल्लीतील मुंडका परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

Manish Jadhav

Delhi Crime: देशाची राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील मुंडका परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. अल्पवयीन मुलीचे वय 16 वर्षे आहे.

पीडितेने पोलिसांत बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सलमान असे आरोपी मुलाचे नाव आहे. त्याचे वय 22 वर्षे आहे.

पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बलात्काराची घटना 29 जून रोजी घडली. पीडितेने सांगितले की, आरोपी तरुण तिला गुरुग्राममध्ये त्याच्या भावाच्या घरी घेऊन गेला होता

दरम्यान, त्या ठिकाणी कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध दिल्याने पीडिता बेशुद्ध झाली. ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. आरोपीने (Accused) तिच्यावर बलात्कार केला होता.

मुलीने बलात्काराला विरोध केला असता आरोपीने तिला कोणाला सांगू नको म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीवर अशाप्रकारे 2-3 वेळा बलात्कार केला. दरम्यान, आरोपी तिला सतत ब्लॅकमेल करत होता.

पोलिसांनी आरोपीला अटक केली

पोलिसात (Police) गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरु केला. डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, मुंडका पोलिस स्टेशनमध्ये आयपीसी आणि पॉक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने शनिवारी मुंडका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

CrPC च्या कलम 164 अंतर्गत दंडाधिकाऱ्यासमोर जबाब नोंदवण्यात आला आहे. यासोबतच पोलिसांनी सांगितले की, आरोपी सलमानला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT