Viral Picture Dainik Gomantak
देश

Viral Picture: सावधान! शार्क टॉयलेटमध्येही असू शकतो

दैनिक गोमन्तक

Viral Picture: इंटरनेटच्या काळात आपल्याला नेहमीच काही ना काही व्हायरल होताना दिसत असते. कित्येकवेळा कितीतरी फोटो आणि व्हिडिओ यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण होऊन बसते.

सोशल मिडियावर आता असाच एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो पाहून लोकांना आश्चर्य वाटत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. सोशल मिडियावर आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्षद गोयंका यांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये टॉयलेटमध्ये शार्क तोंड उघडून बसल्याचे दिसत आहे. मात्र हा जिवंत शार्क नसून टॉयलेटची प्रतिकृती आहे.

पुरुषांच्या स्वच्छतागृहात या शार्क टॉयलेटची प्रतिकृती बसवली आहे. हे शार्क टॉयलेट युनिक असले तरी पहिल्यांदा पाहणाऱ्याला विचित्र वाटू शकते. त्याचबरोबर हे हुबेहुब शार्क तोंड उघडून बसल्यासारखे दिसत असल्याने लोकांना मोठा धक्का बसू शकतो, भीतीही वाटू शकते.

दरम्यान, आरपीजी गृपचे चेअरमन हर्षद गोयंका यांनी ट्वीटर( Twitter)वर ही पोस्ट केल्यानंतर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी यावर मजेशीर कंमेटस करतानाही दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT