Bihar Crime News Dainik Gomantak
देश

Bihar Crime News: धक्कादायक! बिहारमध्ये घरात झोपलेल्या महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पीडितेने या घटनेबाबत गावातील सात जणांविरुद्ध कटरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मुझफ्फरपूर जिल्ह्यातील डुमरी गावात घरात झोपलेल्या महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे महिला गंभीर जखमी झाली. आजूबाजूच्या लोकांनी पीडितेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. पीडितेने या घटनेबाबत गावातील सात जणांविरुद्ध कटरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती मिळतेय.

महिलेचा जमिनीवरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रात्री उशिरा तिच्या घराच्या छतावर शिडीवरून तिघेजण चढले. पॅकेटमध्ये ठेवलेले रॉकेल तेल महिलेच्या अंगावर ओतले आणि माचीसने पेटवून ते पळून गेले.

अचानक लागलेल्या आगीमुळे महिला आरडाओरड करत घराबाहेर पडली. आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत महिला गंभीर जखमी झाली होती. पीडितेला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत महिलेच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे.

घरात झोपले असताना दोघेजण पायऱ्यांवरून घरात शिरले, त्यांच्या हातात रॉकेल होते. त्यांनी रॉकेल माझ्या संपूर्ण शरीरावर ओतले आणि नंतर आग लावली. त्यानंतर मी घराबाहेर पळाले. लोकांनी आग विझवली. प्रकृती बिघडत असल्याचे पाहून लोकांनीच मला रुग्णालयात दाखल केले.

दोघांमध्ये बराच काळापासून जमिनीचा वाद सुरू आहे. यानंतर ही घटना घडली आहे. पीडित महिलेच्या अर्जावरून संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवून पुढील कारवाई करण्यात येत आहे. अशी माहिती पोलिसांनी स्थानिक वृत्तपत्राला दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

Goa Air India: गोव्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फेऱ्यांत कपात; पावसाळी पर्यटनावर होणार परिणाम, इंधनदर वाढीचा फटका

Viral Video: विमानाची टक्कर झाली अन् हवेतच पॅराशूट फाटला... मृत्यूच्या दाढेतून 44 वर्षांची महिला थोडक्यात वाचली; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Goa Fraud Cases: गोव्यातून थेट दुबईत ठोकली धूम! तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांना चकमा; लुकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT