People are dying Rahul Gandhi targets Modi
People are dying Rahul Gandhi targets Modi 
देश

‘लोकांचा जीव जातोय...’; राहुल गांधीचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

दैनिक गोमंतक

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच देशातील आरोग्य व्यवस्थेचेही तीनतेरा वाजले आहेत. दररोज कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद होत असल्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्याचे आवाहन आरोग्य व्यवस्थेसमोर असणार आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरणाचा वेग वाढवणं देखील महत्त्वाचं आहे. मात्र मागील काही दिवसांपासून लसींचा तुटवडा भासत असल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे देखील बंद पडली आहेत. त्यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर (Modi Government) टीकेची झोड उठवली आहे. (People are dying Rahul Gandhi targets Modi)

कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार सगळ्याच पातळ्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. त्यावरुन आता कोरोना लसींच्या किमतीनंतर वसूल करण्यात येत असलेल्या कराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. शुक्रवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Navin Patnaik) यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांना पत्र लिहून कोरोना लसीच्या खरेदीवरील जीएसटी (GST) माफ करण्याची विनंती केली होती. त्या मागणीवरुन आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका केली आहे.

लोकांचा जीव जात असताना पंतप्रधान कर वसूल करण्यात मग्न असल्याची बोचरी टीका त्यांनी आपल्या सोशल मिडियावरील ट्विटरवरुन केली आहे. ‘जनता के प्राण पर PM की टॅक्स वसुली ना जाए,’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर #GST चाही वापर केला आहे.

सरकारने विदेशातून येणाऱ्या कोरोना लसीवरील जीएसटी माफ केला आहे. मात्र देशात तयार होणाऱ्या लसीवर जीएसटी आकारला जात आहे. केंद्र सरकारकडून कोरोना लसीवर 5 टक्के जीएसटी आकारला जात आहे.

कोविशील्ड (Covishield) लसीच्या एका डोससाठी 300 रुपये आणि कोव्हॅक्सिनच्या (Covaccine) एका डोससाठी 400 रुपये राज्यांना मोजावे लागत आहेत. त्यावर 5 टक्के जीएसटीही आकारला जात आहे. त्यामुळे कोविशील्ड 315 रुपयांना तर कोव्हॅक्सिन 420 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे आता राज्यांवर जीएसटीचा अतिरिक्त भार पडत आहे. यासाठी आता राज्यांकाडून जीएसटी माफ करण्य़ाची मागणी जोर धरु लागली आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT